शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

१0 गोष्टी तुमच्या सीव्हीत ‘लिहू’च नका !

By admin | Updated: September 25, 2014 17:36 IST

सीव्ही लिहिणं. किती अवघड काम. कुणाचा सीव्ही मागून कॉपी / पेस्ट केला, तर तो काही ‘आपला’ वाटत नाही आणि स्वत: काही धड लिहिता येत नाही.

सीव्ही लिहिणं. किती अवघड काम. कुणाचा सीव्ही मागून कॉपी / पेस्ट केला, तर तो काही ‘आपला’ वाटत नाही आणि स्वत: काही धड लिहिता येत नाही. त्यात हमखास काही चुका होतात. नको त्या गोष्टी सीव्हीत घुसडल्या जातात आणि मिळणारी नोकरी मग हातची जाते. त्या कुठल्या चुका?
 
 
प्लीज, डू नॉट गेट पर्सनल  
अगदी अलीकडच्या काळापर्यंत लोकं सीव्हीमध्ये नाव-गाव-लिंग-जन्मतारीख-धर्म-जात-पोटजात लिहायचे. 
आता अजिबात लिहू नका. 
सीव्हीत तुमची जन्मतारीख, धर्म, लिंग, लग्न झालंय की नाही आणि फोटो यासगळ्यांची काहीच गरज नाही.  जाती-धर्मासह येणारे अन्य आकस तुम्ही ही सारी माहिती न देऊन टाळू शकतात. फोटो तर अजिबात टाकू नका. ८८ टक्के  मुलांचं जॉब रिजेक्शन त्यांच्या सीव्हीतल्या फोटोमुळे होतं. 
 
स्पेलिंग मिस्टेक्स, गचाळ भाषा
२१ ते २५ वयोगटातील मुलं सीव्ही लिहितात, कॉपी, पेस्ट करतात पण त्यातल्या स्पेलिंग मिस्टेक तशाच. स्पेलचेक लावून करेक्शनही करत नाहीत. ५५ टक्के मुलांच्या सीव्हीमधे अत्यंत मुर्खासारख्या चुका असतात.
इतक्या हलगर्जी माणसांना कुणी काय म्हणून नोकरी द्यावी. सो, प्लीज स्पेलिंग मिस्टेक टाळाच.
 
 
लामण कशाला?
तुमच्या जॉबसाठी आवश्यक तेवढीच माहिती लिहा.ती ही थोडक्यात. अनाठायी लामण लावू नका. पॉईण्टर्समध्ये कामाचं तेवढं लिहा.
 
 
छंदवर्गाची माहिती टाळा.
मला नाणी गोळा करायला आवडतात, मला ना वेगवेगळे दगड गोळा करायला आवडतात. रिडिंग इज माय हॉबी, असला शो ऑफ टाळा. त्यातून पडलंच तर वाईटच इम्प्रेशन पडतं.
 
नकारघंटा बंद.
स्वत:विषयी लिहिताना पॉझिटिव्ह टोनमध्ये लिहा.कितीही मोठी फिलॉसॉफी झाडायची इच्छा असेल तरी नकारात्मक, उपरोधिक भाषेत काही लिहू नका. सोशल मीडियात सतत निगेटिव्ह लिहिणार्‍यांनाही आता जॉब मिळणं अवघड होतंय.
 
नो रेफरन्स प्लीज.
अनेकांना फार घाई झालेली असते, रेफरन्स म्हणून दोन माणसांचे नाव-नंबर देऊन टाकायची. मागितले आहेत का? मग देऊ नका, त्यापेक्षा लिहा की, रेफरन्सेस अव्हेलेबल ऑन रिक्वेस्ट’.
रेफरन्स म्हणून ज्यांची नावं द्यायची त्यांची यादी तयार ठेवा, मागितली तर द्या, नाहीतर नाही.
 
गमजा मारू नका.
स्वत:च्या शिक्षणाविषयी, अनुभवाविषयी, पर्सनल लाईफविषयी खोटी माहिती देऊ नका. नोकरी देताना तुम्ही म्हणताय ते खरंच आहे ना, हे तपासलं जाऊ शकतं.
 
नो स्किल शो ऑफ
बर्‍याच जणांना आपल्याला खूप काही येतं हे सांगण्याची घाई झालेली असते. ती टाळा. तुम्हाला जे येतं ते थोडक्यात, मुद्देसूद सांगा. बढाचढाके बोलाल तर फस सकते है! त्यात सीव्ही मोठा होतो, एका पानापलीकडे सीव्ही वाचायला कुणाला  वेळ  नाही, नसतोच.
 
क्रिएटिव्हीटी टाळाच.
सीव्ही, सिम्पल. सरळ, साध्या टायपात लिहा. अनेकजण इटालिक करतात, फॉण्ट वेगळे वापरतात, अण्डरलाइन करतात, अती बोल्ड लेटर्स वापरतात. कलर्स ओततात. काहीजण हातानं लिहितात.  क्लिप आर्ट वापरतात, हे असलं काही करू नका. सरळ, साध्या टायपात सीव्ही असणं गरजेचं.
 
फंडू भाषा नको.
कट्टय़ावर जी भाषा, जे शब्द वापरतात, ते सीव्हीत लिहू नका. ते कितीही स्टायलिश आणि ट्रेण्डी वाटत असले तरीही ते वापरू नकाच. ७१ टक्के एचआरवाले म्हणतात की, सीव्हीत ‘तसे’ शब्द सर्रास वापरलेले दिसतात.