शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

तळव्यावरची नाजूक कला

By admin | Updated: September 17, 2015 22:33 IST

लहानपणी आवड, छंद म्हणून त्यांनी मेंदी रेखाटनास सुरुवात केली खरी; परंतु आज बॉलिवूडमधील विवाह समारंभही मेंदीशिवाय पूर्ण होत नाहीत.

 - उषा शाह

(मेंदी आर्टिस्ट)
 
लहानपणी आवड, छंद म्हणून त्यांनी मेंदी रेखाटनास सुरुवात केली खरी; परंतु आज बॉलिवूडमधील विवाह समारंभही मेंदीशिवाय पूर्ण होत नाहीत. ऐश्वर्या राय, रविना टंडन, काजोल, अजय देवगण, हृतिक रोशन, जॅकी श्रॉफ, नीता अंबानी, प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनीही माङया डिझाईन्सचं कौतुक केलं. मेंदी काढण्यासाठी मी जगभर फिरलेय.  मला वाटतं खरंच मेहंदी काढणं ही कला जुनी असली तरी आता तिचं रूप बदललंय. आणि माङयासाठी तर ही कलाच एक साधना आहे. 
मध्य प्रदेशमधील अलिजापूर या छोटय़ा गावात जैन मारवाडी कुटुंबात माझा जन्म झाला. आकाशात उडणारे विमानही कधी पाहायला मिळाले नाही असे ते गाव. एकत्र कुटुंबात नऊ भावंडांबरोबर लहानची मोठी झाले. त्या काळात मारवाडी परिवारातील महिला सहसा घराबाहेर पडत नसत. घर, संसार, मुले-बाळे, सणवार हेच  विश्व. काही काम करायचं तर कौटुंबिक वातावरणाच्या चौकटीत राहूनच करावं लागणार होतं. लहानपणापासूनच कलाकुसरीच्या वस्तू बनवून पाहण्याचा छंद होता. फेब्रिक पेंटिंग, हाती भरतकाम, रांगोळी काढणं हे छंद. पण  सर्वाधिक हौस होती ती मेंदी काढण्याची. 
मात्र स्वत:चा हा छंद स्वत:पुरताच व कुटुंबापुरताच मर्यादित होता. माङया कामाचा प्रवास सुरू झाला तो खरंतर माङया लगAानंतर. कमलेश शाह यांच्याशी लगA करून मुंबईत आले. आपल्या हातात जी कला आहे, कौशल्य आहे त्याचा व्यवसाय म्हणून विस्तारण्याचा विचारही मनाला शिवला नव्हता; पण वाळकेश्वर महिला मंडळाने घेतलेल्या मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि तेथूनच मग सुरू झाला कलाविष्काराचा अनोखा प्रवास..  या स्पर्धेतील त्यांचे डिझाइन पाहून अनेकांनी त्यांच्याकडे मेंदी शिकवण्याचा हट्टच धरला. मग मेहंदीचे क्लास घेणं सुरू केलं. 
‘एअर इंडिया’च्या ‘नमस्कार’ या मासिकात मेहंदी डिझाइन प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध अभिनेते कुमार गौरव यांची पत्नी नम्रता दत्त हिने ते पाहिल्यावर जाम आवडले. तिने  मेहंदी काढायला तडक घरीच बोलावले. ‘मेंदी आर्टिस्ट’ म्हणून बॉलिवूडमधील ही जणू एंट्रीच होती. हळूहळू इतरांना माङया कामाची माहिती होत गेली. आणि काम वाढलं. आज माङयासोबत 3क् सहकारी काम करतात आणि ते दिवसभरात तब्बल एक हजार हातांवर मेंदी रेखाटतात. 
पूर्वी मी माचिसमधील काडीने मेंदी काढत होते. पण आता टय़ूबही मिळतात. डिझाइन्सचेही तेच झाले आहे. लहान-मोठे ठिपके, सूर्य-चंद्र, पाने-फुले हेच आधी मेंदीत काढले जात असे. आता मात्र माङया डिझाइन्सचे क्षितिज विस्तारले आहे. या कलेमुळे  मला अंबानी, बिर्ला यांसारख्या दिग्गजांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधता आला. मला मेंदीने रोजगार तर दिलाच; शिवाय आत्मविश्वासही दिला. कला, मग ती कोणतीही असो, तिच्यावर निष्ठा ठेवली तर ती असेच भरभरून देते, असे मला वाटते.