शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रक्तदान करके देखो, अच्छा लगता है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:16 IST

लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे घराबाहेर पडता येत नव्हतं, शिबिरांना परवानगी नाही त्यामुळे रक्तदान झालं नाही. आता रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलं की, रक्तदान करा. कोरोनाच्या संकटकाळात तरुण मुलांनी जबाबदारीने करावी अशी ही गोष्ट आहे.

ठळक मुद्देआपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.

- राहुल गायकवाड

कधी कोणी असा विचारसुद्धा केला नसेल की कोरोनासारखा एक छोटासा विषाणू संपूर्ण जगाला वेठीस धरेल. गेल्या तीन महिन्यांपासून भारत या विषाणूचा सामना करतोय. पुढील अनेक काळ आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, असं जगभरातील तज्ज्ञ सांगताहेत. कोरोनाचा फटका सर्वच विभागांना बसला, तसा तो वैद्यकीय क्षेत्नालादेखील बसला. कोरोनाबाधित रुग्णांच्या सातत्याने वाढत जाणा:या संख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला. त्यातच हाल झाले ते इतर आजारांनी ग्रस्त असणा:या रुग्णांचे. संपूर्ण वैद्यकीय यंत्नणा सध्या कोरोनाला हरविण्यासाठी काम करत असल्याने इतर व्याधींनी ग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे कोणालाच घराबाहेर पडता न आल्याने रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे.त्यामुळे आता रुग्णांवर उपचार करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.एरव्ही पूर असो की कुठलीही नैसर्गिक आपत्ती तरुण मुलं जिवावर उदार होऊन काम करतात. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात अनेक तरुणांनी केलेलं मदतकार्य आपण पा¨हलं आहेच.मात्र ही कोरोनाची आपत्ती अशी वेगळीच की या काळात कुठं कशी मदत पोहोचवणार, घराबाहेर पडता येत नाही, शारीरिक अंतराचे नियम आहेतच, त्यातही अनेक तरुणांनी गरजूंना अन्नाची पाकिटं देणं अशी कामं केली.मात्र आता अजून एक महत्त्वाचं काम आहे जे तरुण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात, ते म्हणजे रक्तदान.कोरोनाच्या काळात अतिमहत्त्वाच्या शस्रक्रियांच्या व्यतिरिक्त इतर शस्रक्रि या बंद ठेवल्याने रक्ताची मागणी इतर वेळच्या तुलनेत कमी होती. मात्र असं असलं तरी ज्या रुग्णांना डायलिसिस करावं लागतं तसंच ज्या कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची गरज होती अशा रु ग्णांना रक्त उपलब्ध होणं अवघड जात आहे. लॉकडाऊनपूर्वी विविध संस्था, महाविद्यालये यांच्यामार्फत रक्तदान शिबिरे आयोजित केली जात होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात अशी शिबिरे आयोजित करता आली नाहीत. त्यातच एकदा घेतलेले रक्त योग्य वेळेत वापरले नाही तर ते खराब होते, त्यामुळे रक्तदानाची प्रोसेस सातत्यानं सुरू असणंही आवश्यक असतं.पुण्यासारख्या शहरात दिवसाला आठशे ते हजार पिशव्या रक्त लागते. लॉकडाऊनच्या काळात मात्न हा पुरवठा होऊ शकला नाही.  अलीकडेच मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे यांनी रक्तदानासाठी पुढं येण्याचं आवाहन केलं. परंतु फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्यानं तसंच घराबाहेर कोरोनाची भीती असल्याने अनेक तरुण समोर आले नाहीत. त्यातच जाहीर कार्यक्रम घेण्यास बंदी असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणंही सामाजिक संस्थांना, रक्तपेढय़ांना शक्य झाले नाही. रक्तदान करायला येणा:या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे तपासणंही शक्य नसल्याने अनेकांनी ही रिस्क घेतली नाही. लॉकडाऊन काळात संचारबंदी असल्याने अनेक रक्तदात्यांना इच्छा असतानादेखील रक्तदान करण्यासाठी जाता आलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊन संपलं तरी कोरोनाची भीती राहाणार आहेच. त्यामुळे पुढेसुद्धा किती तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे येतील, हा प्रश्न आहेच. मात्र आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करून रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाला न घाबरता, रक्तदान करके देखो अच्छा लगता है !

‘रक्ताचे नाते’ या रक्तसंकलनासाठी काम करणा:या संस्थेचे प्रमुख राम बांगड सांगतात, लॉकडाऊनमुळे रक्तदाते रक्तदान करू शकले नाहीत. त्यामुळे या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवला. आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने इतर व्याधींचे रु ग्णदेखील रु ग्णालयात दाखल होत आहेत. त्यातील अनेकांना रक्ताची गरज आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अजूनसुद्धा अनेक लोक हे रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. आम्ही या काळात अनेक शिबिरे घेतली. रक्तदान करताना संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.’कोरोनाला घाबरून रक्तदान टाळू नये, असा त्यांचा सल्ला आहे.  

******या संकटकाळात रक्तदान करून आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतोच. असाच विचार काही तरुणही करतात. अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात ई-पास काढूनही रक्तदान केलं. काहींनी आपल्याला बाकी काहीच करता येत नाही तर निदान रक्तदान तरी करूम्हणत आपला खारीचा वाटा उचलला.संध्या सोनवणो ही तरु णी सांगते, ‘कोरोनामुळे रक्तदान पुरेशा प्रमाणात झालेलं नाही. त्यातच रक्ताची सातत्यानं गरज असल्याने सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे आपल्या परीने आपण काही प्रयत्न करायला हवेत या हेतूने मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.

(राहुल लोकमत डॉट कॉममध्ये वार्ताहर आहे.)