- डॉ. सुनील कुटे
1897 सालच्या प्लेगमुळे भारतात सुमारे एक कोटी लोक मृत्यू पावले होते. त्यानंतर आलेल्या 1918-1920 या काळातील स्पॅनिश फ्लूमुळे जगात सुमारे 5 ते 7 कोटी लोक मृत्यू पावले होते.आणि आता 2019च्या अखेरीस नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू झालेल्या साथीमुळे जगातील 120 देशांत सुमारे 15 लाख लोक बाधित झाले आहेत. एका वेगळ्या अर्थाने हे जैविक विश्वयुद्ध सुरू असून, त्याचा शेवट आर्थिक विश्वयुद्धात होणार आहे. संपूर्ण जग कोरोनामुळे इतके जास्त का धास्तावले आहे? त्याचं कारण हा आजार संसर्गजन्य असून, तो लाखो नव्हे तर कोटय़वधी लोकांना धोका पसरवू शकतो, आणि दुस:या बाजूला लॉकडाउनमुळे त्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याची क्षमताही अधिक आहे.चीनमध्ये 67 दिवस टाळेबंदी होती. आजही जगातल्या शंभरहून अधिक देशात लॉकडाउन आहे. भारतातदेखील 16 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे उद्योगधंदे बंद आहेत. लाखो लोकांच्या नोक:या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जे नोकरीत आहेत, त्यांची पगारकपात अटळ आहे. व्यवसायातलं वातावरण अनिश्चित आहे. 17 मे रोजी लॉकडाउन संपलं तर सर्व काही सुरळीत व आलबेल होईल याची शाश्वती नाही. आज तरी देशातील सर्व शाळा-महाविद्यालयं व विद्यापीठं बंद आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा तर होणार असे सरकारने जाहीर केले; पण ज्या अंतिम वर्षातील विद्याथ्र्याना कॉलेज कॅम्प्सद्वारे नोक:या मिळाल्या होत्या त्यांना प्रत्यक्षात कामावर केव्हा हजर होता येईल याबद्दल निश्चित माहिती नाही, कारण उद्योगधंदेच बंद आहेत. ज्यांना नोक:या मिळाल्या नाहीत ते अंतिम वर्षाची परीक्षा देऊन, उत्तीर्ण होऊन प्रत्यक्षात केव्हा नोकरीला लागतील हे आताच सांगणं, अंदाज वर्तवणंही अवघड आहे.तर मग या अभूतपूर्व अनिश्चित वातावरणात युवकांनी याकाळात काय केलं पाहिजे?येणा:या भविष्यकाळाला कसं सामोरं गेलं पाहिजे? त्यांची भविष्यकाळातील वाटचाल कशी असेल? येणा:या काळाची आव्हानं काय असतील? यासर्व मुद्दय़ांची चर्चा होऊन त्याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे.आजपासून 20 वर्षापूर्वी ए.पी.जे अब्दुल कलामांनी ज्ञानाच्या आधारावर भारत जागतिक महासत्ता होईल असं सांगून त्यासाठी व्हिजन-2020 असा कार्यक्रम देशाला दिला होता. या 20 वर्षात देशातील तरुणांची एक पिढी उदयाला आली आहे. या युवकांनी देशाला महासत्ता बनवण्यासाठी काय योगदान दिलं व या देशाने या पिढीला त्यासाठी काय धोरणं व सुविधा दिल्या याचे मूल्यमापन करणं हा या लेखाचा उद्देश नाही. परंतु कोरोनाच्या साथीमुळे काही गोष्टी ठळकपणो पुढे आल्या. संरक्षणसिद्धता, रणगाडे, पाणबुडय़ा, लढावू विमानं व त्यासाठीच्या लाखो-कोटींच्या अंदापत्रकांइतकीच जगाला व्हेण्टिलेटर्स, औषधं, हजारो खाटांची रुग्णालयं व मूलभूत आरोग्यसुविधा यांचीही गरज आहे. उंचच उंच, शेकडो मजल्यांच्या इमारती, त्यांच्या आजूबाजूला वाढलेल्या झोपडपट्टय़ा, पाणी व सांडपाणी व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांच्याइतकेच नगररचना व नियोजन शास्रही महत्त्वाचं आहे. भव्यदिव्य मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, विमानतळ उभारतानाच निसर्गाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. सतत सिनेमा, टीव्ही, मोबाइल व व्हॉट्सअॅपवर व्यग्र असतानाच स्वत:मध्ये डोकावणं, आत्मसंवादातून व एकांतातील सामथ्र्यातून मन सशक्त बनविणंही गरजेचं आहे. ही यादी अजूनही वाढविता येईल. प्रश्न फक्त एवढचा आहे की वरील सर्व विषयांपासून या देशातील युवक अलिप्त राहू शकतो का? या सर्व विषयांशी तरुणांचा संबंध आहे का? यासाठी ही पिढी काही योगदान देऊ शकेल काय?दुसरीकडे विकासाशी संबंधित या विषयांसोबतच तरुण पिढीशी, त्यांच्या नोकरी व आयुष्याच्या पुढील वाटचालीबद्दलही कोरोनामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनानंतरच्या काळात भविष्याताली तरुण पिढीची वाटचाल कशी असेल?कोणताही देश एक दिवस बंद राहिला किंवा ठेवला तर लाखो-कोटी रुपयांचे नुकसान होते. जेव्हा जगातले 2क्क् पेक्षा जास्त देश महिनाभर व त्याहून अधिक दिवस बंद असतात तेव्हा जगाची अर्थव्यवस्थाच धोक्यात येते. भारतही याला अपवाद नाही. येत्या नजीकच्या काळात लाखो युवकांच्या नोकरीला धोका पोहोचू शकतो वा त्यांना पगार कपातीला सामोरे जावे लागू शकते. तर त्यासाठी तरुणांनी काय करायला हवं?काही गोष्टींचा आतापासूनच विचार आणि तयारी करून ठेवली तर त्यांना मदत होऊ शकेल. विशेषत: तरुण इंजिनिअर्स जे आता नव्यानं रोजगार विश्वात दाखल होणार आहे, त्यांनीही याचा विचार करायला हवा.
1. ह्या परिस्थितीतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे इथून पुढे केवळ पदवीचं प्रमाणपत्र उपयोगी पडणार नाही. विद्याथ्र्याना व तरुणांना विद्यापीठीय अभ्यास व पदवी प्रमाणपत्रखेरीज जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे किमान 1 किंवा 2 कौशल्यं आत्मसात करावी लागतील. 2. परीक्षेच्या आठवडय़ात किंवा परीक्षेच्या तीन दिवस आधी संदर्भ पुस्तकांना हात न लावता, गाइड वा तत्सम पुस्तकातून घोकंपट्टी करून फार तर विद्यापीठाची परीक्षा कशीबशी काठावर पास होता येईल; पण त्यामुळे मिळणा:या प्रमाणपत्रवर आयुष्य जगणं अवघड होईल. वर्ल्ड एकॉनॉमिक्स फोरमने भविष्यात जगभर आयुष्य जगण्यासाठी जी कौशल्ये लागणार आहेत त्याची यादी 2क्16 मध्येच प्रसिद्ध केली आहे. ही यादी पुढची 1क् वर्षे - एक दशक डोळ्यापुढे ठेवून बनविली आहे. आजच्या तरुणांना ही कौशल्ये आत्मसात करावी लागतील. उद्याच्या मुलाखतीत प्रत्येक तरुणाला आपल्या कौशल्यांची माहिती द्यावी लागेल. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात व पुढील 5-6 महिन्यात कौशल्य आत्मसात करण्याची कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.3. नोक:यांची संख्या कमी होण्याची शक्यता गृहीत धरून तरुणांना एक तर मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागेल किंवा नोकरीऐवजी व्यवसायाची कास धरावी लागेल. या दोन्ही बाबींसाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतील. आपण ज्या विषयात पदवी घेतली आहे त्याच क्षेत्रत नोकरी मिळण्याची शक्यता पुढील काळात कमी होत जाईल. त्यामुळे आंतरशाखीय ज्ञान महत्त्वाचे ठरेल. हे ज्ञान मिळविण्यासाठी सध्याचा लॉकडाउनचा काळ महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. प्रत्येक विद्याथ्र्याला आपल्या ज्ञानशाखेशिवाय इतर 1-2 समांतर ज्ञानशाखांमध्येही वर्चस्व प्रस्थापित करावं लागेल. वॉर्डातील नगरसेवक त्यांच्या प्रभागाशिवाय शेजारच्या प्रभागातही आपला संपर्क ठेवतात जेणोकरून प्रभाग रचना बदलली किंवा आपला वॉर्ड राखीव झाला तर शेजारच्या वॉर्ड वा प्रभागातून निवडून येणं शक्य व्हावं, ते जसे त्यांच्या राजकीय करिअरची काळजी घेतात तशीच तरुणांनीही शेजारच्या ज्ञानशाखेशी संपर्क ठेवून आपल्या कारकिर्दीची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी इतर ज्ञानशाखांच्या गरजा व तेथे आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहिती घेण्यासाठी नजीकच्या भविष्यकाळ पूर्ण क्षमतेनं वापरता येईल.4. येणा:या काळात नोक:या कमी होत जातील. त्यामुळे तरुणांनी व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे. काही संस्थांच्या सर्वेक्षण अहवालानुसार आज अस्तित्वात असलेल्या सुमारे 60 टक्के नोक:या कालबाह्य होतील. झोमॅटो, स्वीगी, उबर, ओला, ओयो या सारख्या कंपन्या उदयाला येतील असे मागच्या दशकात कोणाला वाटलंही नव्हतं. भविष्यातही अशा संपूर्णत: नवीन स्वरूपाच्या सेवा वा व्यवसाय अस्तित्वात येतील. त्या काय याचा विचार ज्यानं त्यानं कल्पकतेनं केला तर त्याची गरज आहेच.त्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्ये डोळ्यापुढे ठेवून मिळवणं यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. 5. याहून महत्त्वाचं म्हणजे तरुणांना कोरोनानंतरच्या काळात त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात एक नवीन घटक अंगी बाणवावा लागेल. हा घटक म्हणजे बदल स्वीकारण्याची मनोवृत्ती. सुदैवाने कोरोनाने जबरदस्तीने का होईना; पण हा बदल स्वीकारण्यासाठी जगाला भाग पाडलं आहे. भविष्यात जबरदस्तीने नव्हे तर कार्यशैलीचा भाग म्हणून ही मनोवृत्ती तरुणांना व आजच्या विद्याथ्र्याना स्वीकारावी लागेल.