शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रंगारंग गोंडे

By admin | Updated: June 8, 2017 11:35 IST

कानात, गळ्यात घालायच्यादागिन्यांची एक नवीन फॅशन

- भक्ती सोमण

कमावते नसताना आपण जेव्हा भावाला राखी बांधायचो तेव्हा ती राखी हमखास लाल, पिवळ्या किंवा निळ्या रंगाची गोंड्याची म्हणजे स्वस्तातली असायची. जरा चांगली राखी घेऊया की असं आईला सांगितलं की ती म्हणायची, कमवायला लागलात की घ्या महागडं.

म्हणजे या गोंड्याच्या राख्या स्वस्त असतात आणि त्यांना फारसं ग्लॅमर वगैरे अजिबात नसतं, असं समीकरण अनेकांच्या मनात नकळत तयार झालं. पण सध्या या गोंड्याने मुलींच्या कानावर जादू केलीय. स्वस्त असलं तरी काय झालं, त्याला मॉडर्न टच असलेले कानातले काय फंकी दिसतात म्हणून सांगू, असे डायलॉग हल्ली कॉलेजच्या नाक्यावर, ट्रेनमध्ये वगैरे ऐकायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून तर गोंड्यापासून तयार केलेले कानातले, गळ्यातले, ब्रेसलेट असे काय काय मिळायला लागलं आहे. या प्रकाराला म्हणतात  tassel jewellery.

यात कानातले, गळ्यातलं, ब्रेसलेट असे एकसोएक प्रकार. त्यात फिरकी असलेले, फिरकी नसलेले असे मोठे मोठे गोंडे, त्याचबरोबर शंख असे कॉम्बिनेशन आहे. लोंबत्या कानातल्यात साधारण पाच सहा रंगीत मणी आणि खाली रंगीत गोंडा किंवा नुसतेच छोटे गोंडे अशी फॅशन आहे. गुगल केलंच तर खूप व्हरायटी बघायला मिळतात. त्यात पॉम पॉम या प्रकाराची चलती आहे. जर मोठं कानातलं असेल तर गळ्यातली माळ घालायचीही गरज राहत नाही. पण गळ्यातल्यांमध्येही विविधरंगी गोंडे लावलेल्या माळा किंवा एकच रंगाचा गोंडा असलेली माळ आणि तसेच ब्रेसलेट उपलब्ध आहे. हे प्रकार साधारण ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. फॅशनबाबतीत कधी काय घडेल ते सांगताच येत नाही. जुनं ते सोनं असं म्हणत आता अनेक जुन्या गोष्टींना आधुनिक टच देत लोकप्रिय करण्याचा जमाना आहे. त्यात ही गोंड्यांची फॅशन तर एकदम हटके. तुम्हीही ट्राय करा. -

 (भक्ती लोकमत मुंबईमध्ये उपसंपादिका आहे.bhaktisoman@gmail.com )