शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

चिनी तारुण्याचे हाल बेहाल , हाताला  काम  नाही  त्यात  पुन्हा कोरोना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 14:34 IST

11 जूननंतर बीजिंगमध्ये कोरोना रुग्ण वाढले, त्यात तरु णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या तरु णांनाच पुन्हा लागण झाली आहे. दुसरीकडे हाताला काम नाही, अशा बेरोजगार तरुणांची संख्या वाढते आहे. महागाई आणि तरुण बेरोजगारीचं काय करायचं, असा आता चीनपुढे प्रश्न आहे.

ठळक मुद्देचिनी तारुण्याचे रिकामे हात

कलीम अजीम

सात महिने झाली कोरोना व्हायरस चीनची पाठ सोडायला तयार नाहीये. वुहाननंतर आता राजधानी बीजिंग हॉटस्पॉट म्हणून पुढं आलं आहे. आंतरराष्ट्रीय वृतपत्नं चाळली तर चीनची बदलती परिस्थिती समजते.अर्थात चीन काही सगळी माहिती अधिकृतरीत्या कन्फर्म करत नाही. त्यामुळे ठोस आणि नेमकं काही समजणं अवघड आहेच.व्हायरसची लागण सर्वत्र झाली, त्यानंतर अमेरिकेने अधिकृतपणो तिस:यांदा चीनला दोषी ठरवलं आहे. इतकंच नाही तर जागतिक आरोग्यसंस्था चीनची पाठराखण करतोय, असा आरोप अमेरिकेनं सतत केला आहे. रविवारी झालेल्या प्रचार रॅलीत ट्रम्प यांनी ‘वुहान व्हायरस’ व ‘कुंग फ्लू’ असे शब्द देत चीनवर माहिती लपविल्याचा आरोप केला. शिवाय युरोपमधून चीननं कथितरीत्या जौविक युद्ध छेडलं आहे, अशा बातम्यांचा ओघ अजूनही सुरू आहे. दुसरीकडे हॉँगकॉँगमध्ये स्वायत्ततेच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन सुरू झालं आहे. गेल्या दोन वर्षापासून हाँगकॉँगवाले मुक्ती आंदोलन करत आहेत. या देशाचे सर्व प्रशासकीय अधिकार बीजिंगकडे आहेत. कोरोना संकटात या आंदोलनाने प्रशासनाला अस्थिर केलं आहे, तर दुसरीकडे त्याच शहरात कोरोनाचा फैलाव जलद गतीनं सुरू झाला आहे. बीजिंग हे राजधानीचं शहर; पण सध्या अनेक प्रतिबंध तिथं लागू करण्यात आले आहेत. शहराला मेडिकल छावणीचं रूप आलेलं आहे. नवे रुग्ण असिम्टोमॅटिक म्हणजे ज्यांना कुठलीच लक्षणं नाहीत असे आहेत. असे अनेक रुग्ण सध्या तपासले जात आहेत, देखरेखीत आहेत.नॅशनल हेल्थ कमिशनच्या मते असे रुग्ण वाढत आहेत. शिवाय वुहानमध्येदेखील अशा प्रकारचे रुग्ण वाढत असल्याचं वृत्त आहे. ही लक्षणं पाहून चिनी डॉक्टर्ससुद्धा चकीत झाले आहे. यालाच तज्ज्ञ कोरोनाची दुसरी लाट म्हणतात.चिनी माध्यमांच्या मते 11 जूननंतर बीजिंगमध्ये कोरोना रुग्ण वाढले. त्यात तरु णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या तरुणांनाच पुन्हा लागण झाली आहे. चीन सरकारचे मुखपत्न असलेलं ग्लोबल टाइम्स संशोधकाचा आधार घेऊन म्हणते की बीजिंगमधील बाजारात संसर्ग वाढवणारा व्हायरस युरोपमधून आला आहे.एप्रिलमध्ये जगभरात संसर्गानं कळस गाठला होता, त्यावेळी चीनने स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केलं. लॉकडाऊन उठवण्याची घोषणा केली; परंतु काहीच दिवसांत पुन्हा संसर्ग वाढला. चीनला पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागला. कोरोनामुक्त झाल्याची घोषणा चीनच्या अंगलट आली.गेल्या पाच महिन्यांपासून चीनमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अनेक शहरं व प्रमुख बाजार बंद आहेत. काही शहरात अनलॉकची परिस्थिती आहे. मीडिया रिपोर्ट्सचा आधार घेतल्यास असं दिसून येतं की चीनने फार लवकर रोगावर नियंत्नण मिळवलं. रिपोर्ट्स म्हणतात की, संसर्ग रोखण्यात चीनला वेळीच यश आलं; पण युरोपिअन माध्यमं काहीतरी वेगळंच सांगतात. त्यांच्या मते, चीनने नियंत्रण मिळवलं हे काही खरं नाही.लॉकडाऊन काळात जगभराचं लक्ष चीनच्या हालचालीकडे लागलं होतं. विशेष म्हणजे सोशल मीडियावर यासंबंधी चर्चा अजूनही संपलेली नाही. आता या चर्चा ‘गलवान सीमा’वादावर केंद्रित झाल्या आहेत. जगभरातले सोशल कम्युनिकेटर या विषयावर बोलत आहेत; पण चायना कोरोना हा ट्रेंड अजूनही कायम आहे.सोशल चर्चावर नजर टाकली तर असं दिसतं की चीनमध्येसुद्धा अन्य देशासारखं जॉब मार्केटवर संकट कोसळलं आहे.  नव्या पिढीसाठी काम शोधणं ही राज्यकत्र्यासमोर प्रमुख प्राथमिकता बनली आहे. रिपोर्ट सांगतात की, चीनमधील आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांना पुन्हा कामावर घेणं आहे. ते परतणं आहे.कोरोना उद्रेकाशी चीनने झुंज दिली तेव्हा कोटय़वधी कामगार बेरोजगार झाले किंवा त्यांची फरफट झाली. ज्यांची नोकरी कायम आहे त्यापैकी ब:याच जणांना पगार कपात स्वीकारावी लागली आहे. भविष्यातील चांगल्या शक्यता धूसर आहेत. संसर्गाचा फटका कारखानदारांना बसला आहे. ऑनलाइन डिलिव्हरी फर्मसारख्या सेवाक्षेत्नातील कंपन्यांनी मोठी कॉस्टकटिंग केली आहे.वार्षिक संसदीय सत्नाच्या उद्घाटनवेळी, पंतप्रधान ली केकियांग यांनी कोटय़वधी माणसं बेरोजगार झाल्याची कबुली दिली होती. अनेक जण कमी पगारात, विचित्र कामाचे तास असूनही काम करत असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं.

चीनची गतिशील अर्थव्यवस्था पाहता गुंतवणूक व सार्वजनिक कामावर अधिक निधी खर्च केला जातो. बॅँकांना छोटय़ा व्यावसायिकांना कर्ज देण्यास उद्युक्त केलं जातं. त्यामुळे व्यापारी व कंपन्यांवर कर्जाचा बोजा जास्त आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, अर्थव्यवस्थावाढीचं प्रेशर छोटी उद्यमे व दुकानदारांवर अतिप्रमाणात आहे. शिवाय महाविद्यालयीन तरुण आणि नोकरदारही यात समाविष्ट आहेत. येणा:या काळात ही अस्थिरता अजून वाढू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत.

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)