शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

हे काय बायकांचं काम आहे? हे शोभतं का पुरुषाला? -असं म्हणता तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:10 IST

स्री-पुरु ष समतेच्या पोकळ गप्पा ठोकण्यापेक्षा घरातली कामं शिकू या.

ठळक मुद्देनवीन वर्षात आपण संकल्प करू या, की कोणतेही काम छोटे-हलके नाही

प्राची  पाठक 

एकीकडे स्त्री समानतेच्या गप्पा, दणक्यात त्यासंदर्भात करायचे फॉरवर्ड, भाषणं सगळं चालतं. दुसरीकडे घरात कामं फक्त आईने किंवा बहिणीने करायची, आपण किचनमध्ये कधी जात नसतो, असा एकुण तोरा. हल्ली तर सरसकट आरोपच होतो की, शहरातल्या लाडावलेल्या मुलांना तर साधा चहा, वरण-भाताचा कुकर लावणं, आपल्याच घराची झाडलोट करणं, घर स्वच्छ ठेवणं, गरज पडल्यास स्वतर्‍चेच कपडे धुणं, आपलं जेवणाचं ताट जागेवर आणि धुऊन ठेवणं. इतकी क्षुल्लक कामंही येत नाहीत. ‘कामवाली बाई करून घेईल’ असा अ‍ॅप्रोच ठेवतात. त्याचवेळी खेडोपाडी कितीतरी मुली घरात आवरासावर करून, पाणी भरायला दूरवर जाऊन, स्वयंपाक करून मग शाळा-कॉलेज, जॉबसाठी घराबाहेर पडतात. खेडय़ातली काही तरु ण मुलं शेतात आणि घरात कामं करताना थोडीफार दिसतात, मात्न शहर असो की खेडं बहुतेक तरुण नाक्या-नाक्यावर चकाटय़ा पिटत, घोळक्यात एकत्न जमून मोबाइलमध्ये काहीतरी खेळत बसलेली असतात. गुटखा, मावा वगैरे खात इथे-तिथे पचापच थुंकत उभी असतात. घरातल्या कामाचा जास्तीत जास्त भार घरातल्या स्रियांवर पडलेला असतो, त्या कमावत्या असो की नसो.  घरकाम करुन पाहणं, यात कमीपणा काय आहे?

* काय करता येईल?नवीन वर्षात आपण संकल्प करू या, की कोणतेही काम छोटे-हलके नाही आणि घरातले कोणतेही काम स्रीचे/ पुरु षाचे असे नाही. गॅस सिलिंडर संपला, टय़ूब उडाली तर ते बदलायला आपल्याला पुरु षाला हाक मारायची गरज नाही.  आपण मुलगा असो की मुलगी रोज स्वयंपाकघरात राबणार्‍या व्यक्तीला थोडीतरी मदत करतो का, ते बघू या. एखादी भाजी बनवून पाहू. पोळ्या लाटून बघू. आठवडय़ातून एक दिवस पूर्ण स्वयंपाक आणि त्यानंतरची आवरसावर आपण करू, असं काही प्लॅन करू. किमान आपल्याला खायला आवडतात, त्या डिशेश तरी कशा बनतात, त्यात हेल्दी ऑप्शन्स काय काय आहेत, ते शोधून बघू. हातातल्या मोबाइलचा या कामासाठी वापर करून बघू. खाद्यपदार्थाची माहिती आपण शोधून काढू. घरातला भाजीपाला आठवडय़ाच्या आठवडय़ाला आणायची जबाबदारी घेऊ. 

* त्याने काय होईल?1- घरातल्या स्रिया किती कामं करतात आणि त्यावाचून किती अडतं हे कळेल.2- शिस्त आणि स्वावलंबनाची जाणीव होईल.3- शिक्षणासाठी किंवा इतर काही कारणांसाठी बाहेरगावी राहायची वेळ आल्यावर, हे धडे किती उपयोगाचे आहेत, होते हे कळेल.4. चांगला भाजीपाला कसा ओळखावा, त्याची किंमत काय, बाहेर खाताना आपण कचर्‍यालाही किती किंमत मोजतो, याची कल्पना येईल. 6- पालकांशी पटलं नाही, तर ‘मैं घर छोड के जा रहा हूॅँ’ अशी तरु णपणी अधूनमधून जी हुक्की येते, तिच्यासाठी किती पापड बेलने पडते हैं, याची जाणीव होईल. 7- त्याही पलीकडे, किमान आपल्या गरजेपुरता तरी स्वयंपाक आपल्याला बनवता येणं, हे बोअरिंग काम नसून तीसुद्धा एक कला, प्रोफेशन आहे, हे कळेल.