शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

डिजिटल डिटॉक्स : हातातला मोबाईल तुरुंग झालाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:30 IST

स्क्रीनच्या तुरुंगातून बाहेर पडून मोकळा श्वास, स्थिर मन आणि शांत झोपेच्या मार्गावर..

ठळक मुद्देरात्री झोपायच्या किमान एक तास आधी आपल्या हातातला फोन पूर्णपणे बाजूला ठेवायला शिकू

प्राची  पाठक 

शेवटचं आभाळाकडे कधी निरखून बघितलं होतं, आठवतंय? शेवटचं झाडांच्या फांद्यांमधून निळ्या आकाशात उडणारे पक्षी कधी शोधले होते आठवतंय? रात्री आकाशातलं चांदणं बघत झोपून गेल्याची आठवण किती जुनी झालीये, आहे लक्षात? आपल्या पिकनिक स्पॉटला जाऊन सूर्याकडे पाठ करून सनसेटला स्वतर्‍चाच फोटो काढून घेण्यापलीकडे आपल्या घराच्या पुढे-मागे सूर्य कधी, कुठून उगवतो आणि कुठे मावळतो, ते कधी शोधलं आहे? घरात येणारे उन्हाचे कवडसे तरी कधी पाहिले शेवटचे? बरं, बाहेरचं जाऊ दे. जरा घरात डोकावू - घराच्या भिंती, घरातल्या टाइल्स, घरातली रचना तरी शेवटची कधी मन लावून बघितली आहे? ह्या सर्व गोष्टींमध्ये काय मजा आहे, ते तरी माहीत आहे का? आपलं घर, आपली खोलीसुद्धा आपल्याशी काही बोलू बघत असते. आपण तिला कधी वेळ दिलाय? - घरी आलं की फोनमध्ये डोकं खुपसून बसायचं आणि बाहेर गेलं तरी तेच करायचं. का? कुठे जरा उसंत मिळाली की लगेच आहेच फोनची स्क्रीन धुंडाळणं. घरी पाहुणे येवोत, आपल्याला भेटायला कोणी खास येवो, त्या त्या वेळी ती व्यक्ती सोडून फोनमधली एकूण एक व्यक्ती जणू चॅट करायला रिकामीच बसली आहे, अशा थाटात आपण फोनमध्ये गुंतलेले असतो. समोर कोणी चॅट करायला नसेल, तर इकडचे तिकडचे व्हिडीओज बघ, कोणाचे फॉरवर्डस चेक कर, कुठे कोणाचे स्टेट्स बदललेलं तपासत बस, असेच उद्योग आपण करत असतो. त्या निमित्ताने भारंभार माहिती फोनमध्ये, मेल्सवर डाउनलोड करून ठेवतो. व्हॉट्सअ‍ॅपला मेसेजेसचा हा मोठ्ठा स्क्रोल साचवतो. फोनची स्पेस कमी पडली? - वाढवा त्याची मेमरी.. फोन स्लो चालतोय?- बदला फोनचं मॉडेल.. नेट स्लो चालतंय?- वाढवा त्याचा टॉप अप. घ्या भारीतला प्लॅन!सगळं डोकं फोन, मेसेज, सेल्फी, नेट स्पीड, स्टेट्स अपडेट यांनी भरून ठेवायचं. कोणाचं काय चाललंय, कोण काय करतंय, यावर कडक पहारा सतत. त्यात कानात हेडफोन आणि त्यात मोठय़ाने गाणी सुरू. कोणाचं काही का होईना.. त्यात आपलीही वाट लागतेय, याचंही भान हरपून गेलंय. वजन वाढतंच आहे. टेनिस एलबोसारखी दुखणी हाताला होत चालली आहेत. शरीराचं पोश्चर बदलत जातंय. डोळ्यांचं आणि कानाचं जे होईल ते होणारच आहे. पण, ह्या सर्व माहितीच्या भडिमारात मनाचं काय होतंय, कधी विचार केलाय? 

काय करता येईल?

जरा हातातल्या त्या पाच-सात इंची स्क्रीनमधून बाहेरच्या जगातल्या मोठय़ा खिडक्यांमध्ये डोकावून बघू. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, ते नीट समजून घेऊ. नेट आणि फोन किती आणि कसा-कशासाठी वापरायचा, ती शिस्त स्वतर्‍ला लावू. डिजिटल डिटोक्स! रोज आपण किती वेळ मोबाइल सर्फ  करत बसणार आहोत, त्याचा एक प्लॅन बनवू. नका लिहू तो प्लॅन कागदावर. मनातच कच्चा प्लॅन बनवा. काहीच हरकत नाही. पण तो आपण पाळणार आहोत, हे स्वतर्‍ला बजावा. दिवसभरात फोन, र्अजट फोटो, र्अजट मेसेज आणि कामापलीकडे केवळ निव्वळ टाइमपास म्हणून आपण जे फोनवर करत असतो, ते सध्या किती वेळ करतो आहोत, त्याचा आढावा घेऊ. तो वेळ कसा कमीत कमी करत नेता येईल, ते ठरवू. दर तीन तासाने पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं फोन सर्फ  करायचा, असं करत करत हे वेळेचं गणित सोडवत जाऊ. सकाळी अमुक वेळेनंतरच फोन हाती घेईन, हे पक्कं ठरवू. रात्री झोपायच्या किमान एक तास आधी आपल्या हातातला फोन पूर्णपणे बाजूला ठेवायला शिकू. फोनच्या अमर्याद वापराला एक शेडय़ुल देता येतंय का, ते बघू. 

त्याने काय होईल?

1. मनातला आणि डोक्यातला कलकलाट कमी होईल.2. हातातल्या स्क्रीनवरल्या आभासी जगापलीकडल्या खर्‍या, वास्तव जगाशी तुटत चाललेलं आपलं नातं पुन्हा जोडता येईल.3. अटेन्शन स्पॅन कमी झाला असेल, तो हळूहळू वाढवत नेता येईल. न साधणारी एकाग्रता साधू लागेल.4. बाकीचे फरक जाणवायला वेळ लागला, तरी घरातल्या माणसांशी बिघडलेलं नातं सुधारेल आणि रात्री नीट झोप येऊ लागेल, हे नक्की!