शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

बिन नवर्‍याचं सासर

By admin | Updated: June 26, 2014 19:02 IST

रात्री वेळेत परतलं नाही तर शिक्षा होते, मेसच्या वेळा ठरलेल्या असतात. पाणीदार पांचट वरणाच्या चवी बदलत नाहीतच. आंघोळीसाठी रांगा आणि टॉयलेटच्या बाहेर हुज्जतींना अंतच नसतो. त्यालाही हॉस्टेलच म्हणतात.

अँडमिशन एकदाची झाली की, खरी धावपळ सुरू होते ती हॉस्टेल आणि पीजी म्हणून रहायची व्यवस्था करण्याची.
दुसरं गाव, दुसरं शहर, घरची कटकट नाही, कुणाची रोकटोक नाही, प्रश्न कुणी विचारत नाही, उत्तरं द्यावी लागत नाही.
आपण आपल्या मर्जीचे राजे.
वाट्टेल ते केलं, वाट्टेल तेव्हा केलं.
कुणाला खुलासे द्यावे लागत नाहीत,
तासन्तास फोनवर बोललं तरी चालतं,
रात्री उशिरा झोपलं तरी चालतं,
नाही जेवलं तरी चालतं,
वडापाववर राहिलं तरी चालतं.
मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत कितीही वेळ बोललं तरी वेळेचं भान राहत नाही, वेळ पुरत नाही. घड्याळ पहावंसं वाटत नाही आणि बोलण्याचे विषय आणि खिदळणं काही केल्या संपत नाहीत.
पण हे आणि एवढंच म्हणजे हॉस्टेल नाही.
रात्री वेळेत परतायची शिस्त असते.
मेसच्या वेळा ठरलेल्या असतात.
पाणीदार पांचट वरणाच्या चवी बदलत नाहीतच.
आंघोळीसाठी रांगा आणि टॉयलेटच्या बाहेर कराव्या लागणार्‍या हुज्जतींना अंतच नसतो. त्यात पीजी म्हणून राहणं म्हणजे तर ‘बिन नवर्‍याचं सासर.’
सासूरवास जबरदस्त आणि अटी इतक्या जाचक की, आपल्या घराच्या आठवणीनं डोळ्याला पाण्याच्या धारा लागतातच.
 नको वाटतं ते राहणं. अनेकांचं तर नाहीच पटत, ते हॉस्टेल सोडतात, पीजी म्हणून राहतात. तिथंही पटत नाही म्हणून दुसरीकडे जातात.
पण तरीही दोन गोष्टींचं जमत नाहीच. एक म्हणजे पीजी म्हणून किंवा हॉस्टेलमध्ये राहताना रूममेट्सशी पटत नाही.
आणि सगळ्यात अवघड म्हणजे जेवणाचे वांधे. काही केल्या त्या चवींशी पटवून घेता येत नाहीच.
ज्यांना या दोन गोष्टी उत्तम जमतात, त्यांचं हॉस्टेल लाइफ एकदम जिंदगी वसूल करून टाकतं. 
तशी जिंदगी वसूल संधी आपल्याही वाट्याला यावी म्हणून हॉस्टेलला जाताना लक्षात ठेवण्याच्या या काही गोष्टी.
सल्लाबिल्ला अजिबात नाही, आजवर हॉस्टेलमधली दुनियादारी ज्यांनी हमखास जमवली, त्या वस्ताद पोरापोरींशी बोलून ‘ऑक्सिजन’ने जमवलेली ही खास अंदर की बात.
हॉस्टेलचं पॅकिंग करताना, ही लिस्ट तुमच्या सामानात टाकणं विसरू नकाच.
- अंजन पाटील
 
हॉस्टेलला जायचं म्हणजे आपण पूर्ण स्वतंत्र, एकदम फ्री हे सारं डोक्यातून काढून टाका. आपण ‘शिस्तबद्ध’ अणि ‘नियंत्रित’ आयुष्य जगायला चाललो आहोत, असं सांगा स्वत:ला. 
म्हणजे काय तर घाबरू नका. बी टफ हा पहिला मंत्र पाठ करून टाका. आपल्या घरात आपण कसेही वागलो तरी लोक सहन करतात. पण बाहेरच्या जगात हे आपलं पहिलं पाऊल, लोक आपल्याला जोखतात. त्रासही देतात आणि जीवही लावतात. त्यापैकी आपल्या वाट्याला काय येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सिच्युएशन ‘पॉझिटिव्हली’  हॅण्डल करणं महत्त्वाचं.
आपल्या चॉईसचे रुमी आपल्याला काही मिळत नसतात, त्यामुळे आयुष्यातली ही पहिली संधी. जी माणसं आपल्या चॉईसची नाहीत, आपल्या आवडीची नाहीत, कदाचित आवडणारही नाहीत, अशा माणसांबरोबर राहून त्यांच्याशी दोस्ती करत निभावण्याचं हे मोठ्ठं टास्क हॉस्टेल देतं. ते जमलं तर आपण आयुष्यात कुणाहीबरोबर उत्तम काम करू शकतो.
हॉस्टेल किंवा पीजी म्हणून राहताना अनेक जण एकमेकांच्या वस्तू शेअर करतात. न सांगता पेस्ट वापरणं, टॉवेल वापरणं, आपला इस्त्री केलेला शर्टच घालून जाणं, परफ्यूम किंवा लिपस्टीक सर्रास घेणं. एकतर असं शेअरिंग होतं, हे शिकून घ्या. मान्य करा. तुमच्या काही गोष्टी इतरांनी अजिबात वापरू नयेत असं वाटत असेल तर तसं अत्यंत सभ्य आणि नम्र शब्दात सांगा. अपमान करू नका, फक्त प्रेमानं सांगा. तरीही नाही ऐकलं तर त्या रुमीच्या हाताला लागणार नाहीत, अशा ठेवण्याचं स्किल तरी शिकून घ्याच.
जेवणाचे हाल जबरदस्त होतात. त्यामुळे रोज उठून रडू नका. जे आहे ते आनंदानं खायची सवय हॉस्टेल लावते. ती लावून घ्या.
रुमी म्हणजे जीवाभावाचे दोस्त, असं या काळात होतं. पण ज्या गोष्टी आपल्याला करणं जमत नाही, त्या सुरुवातीपासून करू नका. काही जण पहिले फार प्रेमानं वागतात आणि मग नंतर त्याचा त्रास होतो म्हणून चिडचिड करतात.
तुम्ही जसे आहात तसे रहा, उगीच बदलू नका किंवा प्रिटेण्ड करत अतिशिष्टपणाही करू नका आणि अतिनम्रपणाही. तसं केलं तरच तुमची ज्यांच्याशी दोस्ती होईल ती खरी खरी होईल.
काही जण रुमींशी इतकी दोस्ती करतात. पझेसिव्हच होऊन जातात. आपल्याशिवाय रुमी दुसर्‍या कुणाशी बोलला किंवा बोलली तरी ते नाराज आणि इनसिक्युअर होतात. आपलं असं काही होत नाही ना, हे चेक करा. मैत्रीची र्मयादा आपल्याला समजलीच पाहिजे. ती र्मयादा काय हे शिका.
हॉस्टेलमधून घरी नियमित संपर्क करा. घरच्यांना काय चाललंय हे सांगा, नाहीतर काही जण हॉस्टेलमध्येच इतके रमतात की भावाबहिणीपासून तुटतात. तसं होऊ नये याची काळजी घ्या.
हॉस्टेलमध्ये राहताना आपण कसं बोलतो, कसं वागतो, कसे कपडे घालतो यावरून आपली एक इमेज ठरते. त्यामुळे आपल्या वर्तनाकडे लक्ष द्या. अनेकांचं असं हमखास होतं की, त्यांना जे बोलायचं नसतं तेच ते बोलतात. जसे नसतात तसे आहेत असं लोकांना वाटतं. आणि मग त्यातून जो मनस्ताप होतो तो निस्तरणं अवघड असतं.
हॉस्टेल लाइफ म्हणजे निव्वळ आनंद, पण त्या आनंदात घेण्यापेक्षा देणं जास्त अभिप्रेत असतं. त्यामुळे इतरांशी भरपूर दोस्ती करा. हसा, आनंद वाटा, मदत करा. विश्‍वास ठेवा.
मग बघा, हॉस्टेलमधली चार-पाच वर्षं आयुष्यच बदलून टाकतील.