गणपती बाप्पा आले, आता शेवटच्या तीन दिवसांत जगून घ्यायचं त्यांच्यासमोर! काय काय नाही होत या दहा दिवसांत. अथर्वशीर्ष पठण करण्याची मजा या दहा दिवसांत काही औरच असते. गणोश चतुर्थीच्या आधीच जिकडेतिकडे गणपतीबाप्पाचे स्टॉल्स दिसू लागतात. आता गणपती येणार म्हणून पिंटू, पिंकी, घरातले शाळेत जाणारे चिमुकले शाळा सुटली की कुठेही न थांबता पटकन घरीच येतात. एरवी ऑफिसातून दहा वाजता घरी येणारे बाबा आठलाच घरी येतात. मग एका स्प्लेंडरसारख्या बाइकवरून चौघे मूर्तीचे अॅडव्हान्समधेच बुकिंग करायला निघतात. फार काळजीपूर्वक, नाजूक पण सुंदर थर्मोकोलचं मखर आणि सजावटीचं सामान घेऊन ते घरी येतात. हजार मूर्तीमधून या कुटुंबाला आवडलेला ‘गणेश’ हा त्यांच्यासाठी नेहमीच वेगळा असतो. ती ‘मूर्ती’ फक्त त्यांचीच असते. प्रत्येक कुटुंबाच्या आवडीनुसार त्यांना आवडतील अशी मूर्ती अगदी मिळतेच.
अर्थात गणोशाला विकत आणतानासुद्धा बार्गेनिंग केलं जातं. मग येतो तो ‘दिवस’.. या दिवशी वाजत-गाजत येणा:या बाप्पात प्राण फुंकले जातात.
पण डोक्यावर मिरवत आणलं की गिचमिडीने सजलेल्या छोटय़ाशा पिंज:यागत थर्मोकोलच्या मखरात त्याला बसविलं जातं. अंगावर वेगवेगळ्या फुलांच्या माळा, हजारांच्या दूर्वा. कसं वाटत असेल त्याला?
कसा तो बिचारा दहा दिवस सहन करतो आपल्याला?
त्यात चोवीस तास सतत त्याच्या कानावर पडणारे अश्लील गाण्यांचे, तर कधी चांगल्या गाण्यांचे आवाज, तेच ते ऐकून ऐकून त्याचं डोकं दुखत नसेल का? तसं बघायला गेलं तर पौराणिक कथांमधे गणोशाचा उल्लेख नेहमीच ‘बालगणोश’ असाच केलेला आढळतो. आपणही त्याला बालगणोशाप्रमाणो आवडणारे मोदक, वेगवेगळे गोड पदार्थ खाऊ म्हणून देत असतो. पण ते निरागस लहानपण हिरावून घेत आपण त्याच्या आनंदी उत्सवाचा एक बिझनेस इव्हेण्टच करून टाकलाय.
त्यात नवस करकरून सतत त्याच्याकडे काहीतरी मागत राहायचं, तेही स्वत:साठी! त्यालाही कदाचित आपल्या या मागरेपणाचा कंटाळाच येत असेल. एकीकडे त्याच्या उत्सवात किती पैसा खर्च होतो, तर दुसरीकडे जे गरीब, गरजू आहेत त्यांच्यार्पयत आपण मदतीचा हात पोहचवतही नाही. आपण त्याच्याकडे सारं मागतो, पण जे इतरांना देऊ शकतो ते आपण तरी देतो का? यंदा तर बाप्पालाही वाटत असेल की, इथं चंदनाने, अत्तराने मला माखण्यापेक्षा, फुलांमधे ऐटीत बसवण्यापेक्षा या माणसांनी तिथे दुष्काळग्रस्त शेतक:याला मदतीचा हात द्यावा. तोच माझा प्रसाद.
पण शांतपणो हे सारं समजून घ्यायला आपल्याला वेळ कुठाय?
आपण नाचतोय, आपल्याच तालात. गणपती बाप्पा, आम्हाला सद्बुद्धी दे.
फार नाही एवढंच मागणं!
- ओजस कुलकर्णी