अनिल भापकरanil.bhapkar@lokmat.com
एखादा माणूस खूप त्रस देत असेल, कुणाविरुद्ध आपल्याला पुरावाच ठेवायचा असेल, तर रेकॉर्ड करा, त्याचे सगळे कॉल्स ! तेही सहज, तुमचा स्मार्टफोन वापरून.
-------------
कुणाच्या लँडलाइन किंवा मोबाइलवर जर काही धमकीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे फोन कॉल्स येत असतील आणि पोलिसांत तक्रार केली तर ते कॉल रेकॉर्ड होण्याची व्यवस्था केली जात असे. त्यासाठी विशेष तांत्रिक व्यवस्थाही वापरण्यात येत असे. तेव्हा कुठे तुम्हाला येणारे कॉल्स रेकॉर्ड केले जात. तेही तसे किचकटच काम. आता मात्र या टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. त्यासाठी अनेक कॉल रेकॉर्डिग अॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगले अॅण्ड्राईड अॅप म्हणजे ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर.
हवा कशाला कॉल रेकॉर्डर?
1) समजा, तुम्ही एखादी मोठी डील करता, त्याच्या सर्व अटी आणि शर्ती तुम्ही समोरच्या पार्टीशी मोबाइलवर बोलून ठरवता. मात्र प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बैठकीला बसता तेव्हा समोरची पार्टी अचानक शब्द फिरवायला लागली तर त्याक्षणी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ऑटोमॅटिक रेकॉर्ड झालेले संभाषण ऐकवू शकता. तुमची बाजू मजबूत करू शकता.
2) तुमचा काही व्यवसाय असेल आणि तुम्ही ग्राहकांशी बोलून फिडबॅक घेतही असाल. ग्राहक अनेक तक्रारी करतात. या सर्व तक्रारी ज्या तुमच्या स्मार्टफोनवर ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतील त्या तुम्ही तुमच्या सेल्स आणि सव्र्हिस टीमला ऐकवून त्यावर तोडगा काढू शकाल.
3) समजा तुमच्या बॉसने तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टविषयी फोन करून ब:याच सूचना तसेच बदल सुचविले आणि तेच तुम्ही विसरले तर? त्यापेक्षा तुम्हाला बॉसने काय काय सूचना किंवा बदल सांगितले हे रेकॉर्ड केलं तर अचूक काही गोष्टी करू शकता. बॉस पुन्हा म्हणालाच की, मी असं बोललोच नव्हतो तर ते रेकॉर्डिग ऐकवू शकता. मुद्दा काय, तुम्हाला जिथं पुरावा हवा, त्यासाठी ते बोलणं रेकॉर्ड करणं आता सोपं झालं.
या रेकॉर्डर्समधे आहेत काय?
1) क्लाऊड
तुमचे जर ड्रापबॉक्स किंवा गुगल ड्राइव्हवर अकाउंट असेल तर तुमचे ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर तुमचे कॉल रेकॉर्डिग त्यात आपोआप सेव्ह करेल. म्हणजे तुमच्या एक्स्टर्नल मेमरी कार्डवरील स्पेस यामुळे वाचू शकते.
2 ) रेकॉर्डिग पाथ
तुमचे कॉल्स कुठे रेकॉर्ड करायचे म्हणजे इंटरनल मेमरी कार्डवर रेकॉर्ड करायचे की एक्स्टर्नल मेमरी कार्डवर रेकॉर्ड करायचे, तसेच कुठल्या डिरेक्टरीमध्ये रेकॉर्ड करायचे हेदेखील तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तुम्हाला शोधायला सोपे जाऊ शकेल.
3) नोटिफिकेशन
यामध्ये स्मार्ट फोनवर नोटिफिकेशन बारमध्ये दाखविण्यासाठी न्यू कॉल आणि शो कॉलर इमेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी तुम्हाला नोटिफिकेशन हवे असल्यास त्याला सिलेक्ट करावे अन्यथा करू नये.
4) कॉन्टॅक्ट
रेकॉर्ड ऑल, इग्नोर ऑल आणि इग्नोर कॉन्टॅक्ट असे पर्याय आहेत. त्याचप्रमाणो कुठल्या कॉन्टॅक्टवरून कॉल आल्यास तो रेकॉर्ड करायचा आणि कुठले कॉल इग्नोर करायचे हे ठरवता येऊ शकते.