शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं मत स्वतंत्र झालंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 06:50 IST

आज 15 ऑगस्ट, लोकशाहीचा सुजाण मतदार होण्याचं स्वातंत्र्य टिकवायचं की व्हायचं गुलाम, तुम्हीच ठरवा!

ठळक मुद्देमत देताना तुम्ही काम पाहता की जात पाहता? उमेदवारानं दिलेल्या माहितीचा अभ्यास करुन मत देता की देता ठोकून जातीचा माणूस म्हणून?

 - मिलिंद थत्ते

राजकीय सत्ता मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला पहिला व सगळ्यात रुढ मार्ग आहे - मतदारांना येडय़ात काढायचा! मतदाराच्या पोटात अन्नाचा दाणा नसला तरी चालेल, पण त्याच्या भावनांना भुलवायचे. त्याच्या डोईवर पागोटी बांधायची नि लंगोटी काढून घ्यायची. अन् तेही येडं पागोटी कुरवाळत बसतंय! पायाखालची जमीन जाते, रोजीरोटीला उपयोगाचं शिक्षण नसतं, शेतीला पाणी नसतं, पिकाला बाजारभाव नसतो, पण आपल्या जातीतल्या माणसाला निवडून द्यायला आपण त्याचे सगळे गुन्हे विसरतो! हेच ते - लंगोटी गेली तरी पागोटी कुरवाळणं.  आपण ज्याला निवडून देतो किंवा आपला पुढारी मानतो, तो आपल्या जीविकेसाठी किंवा पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय करतो याकडे लक्ष न देता त्याच्या जातीकडे पहायला आपल्याला शिकवले जाते. एका दुष्काळी तालुक्यातले एक आमदार होते. त्यांनी मोठय़ा प्रमाणात पाणी वाचविण्याची कामे करून घेतली. त्यांच्या तालुक्याच्या नावाने जलसंधारणाचा पॅटर्न प्रसिद्ध झाला. दुष्काळ मिटला, पण पुढच्या निवडणुकीत जातीचे वाद झाले आणि ते निवडणुकीत हरले. मतदारांनी माणूस न पाहता जातीला मत दिले. असेच धर्माच्याही बाबतीत आहे.सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार - यांची कामं काय असतात? त्यांचे काम त्यांनी केलं का? हे आपण बघतच नाही. त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांना पाडा - असं मतदार म्हणून आपण म्हणतच नाही. त्या त्या वेळी जी भूल पडेल त्यात बटण दाबायचे! कुठला झेंडा, कुठला टिळा लावला की आपण मतदार फसतो हे  राजकारण्यांना चांगलं माहीत असतं. मग लग्ना-मयतात जायचं, सर्व प्रकारच्या देवळात निवद दावायचा, विविध जातीतल्या संतांच्या जयंत्या-मयंत्या करायच्या - अशी सोंगं करून मतदार भुलवायचा. वर्षानुवर्ष पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललं आहे. आपण नवीन पिढीचे मतदारही असेच बावळट आहोत का? की आपल्याला यांच्या कामाचा हिशेब करता येतो? असोसिएशन फॉर डेमोक्र ॅटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे. ते दर निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांची आर्थिक प्रगती, गुन्हेगारी प्रगती प्रसिद्ध करतात. त्यांच्या वेबसाइटवर ही सर्व माहिती वाचता येते. हीच सर्व माहिती आपल्याला थेट निवडणूक आयोगाकडूनसुद्धा मिळू शकते. सर्व उमेदवारांना एक प्रतिज्ञापत्न आयोगाकडे सादर करायचं असतं. त्यात त्यांची व कुटुंबाची संपत्ती जाहीर केलेली असते. मागील पाच वर्षात त्यात किती फरक पडला तेही आपल्याला कळू शकतं. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, सिद्ध झालेत तेही कळतं. ही सारी माहिती खुली असते. सरकार सुधारायचे तर चांगली कामं करणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजेत. जातीचं भूत कितीही वाढवलं ंतरी लोक फसत नाहीत - ही अक्कल आपण मतदारांनी पुढार्‍यांना शिकविली पाहिजे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधली एक चांगली गोष्ट अशी की कोणत्याही जातीय किंवा धार्मिक वादाचा मुद्दा या निवडणुकांमधला मुख्य मुद्दा नव्हता. काही लोकांनी असे जातीय मुद्दे आणायचा प्रयत्न करून पाहिला, तरीही ते मुद्दे कोपर्‍यात पडले. जातीय ध्रुवीकरणाशिवायही जिंकता येतं हे या निवडणुकांनी दाखवून दिलं. आपल्यासारख्या नव्या दमाच्या मतदारांसाठी ही फार चांगली संधी आहे. इथून मागं फिरायचं नाही, फिरू द्यायचं नाही. नया इंडिया अपनेको जैसा चाहिए, वैसाच बनानेका!