शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मशीन्स खोलात जाऊन अभ्यास करू लागले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:49 IST

इमेज रेकगनायझेशन ही डीप लर्निगची सुरुवात पण आहे आणि  यश सुद्धा आहे. एकूण काय तर डीप लर्निग हे एकूणच एआयची जनमानसात इमेज सुधारतंय हे नक्की!!

ठळक मुद्देमानवी मेंदूत जशी नियमांची यादी तयार होते तसं संगणकाने ‘शिकणं’ यावर एआयमध्ये एक विशेष भाग येतो.

- डॉ. भूषण केळकर

जर्मनी फिफामधून बाहेर!  धक्का? एआयमधलं स्टॅटिस्टिक्स (सांख्यिकी) काय सागतंय बघा, 1988 मध्ये फ्रान्स जगज्जेता - 2002 मध्ये असाच बाद! 2006 मध्ये इटली जगज्जेता आणि 2010 मध्ये बाद! 2010 मध्ये स्पेन जगज्जेता आणि 2014 मध्ये असाच बाद! 2014 मध्ये जर्मनी जगज्जेता आणि.एआयने 2018 मध्ये सांगितलं की गटसाखळीतून पुढे गेला तरच जर्मनी जिंकू शकतो अन्यथा स्पेन, ब्राझिल यांना अधिक शक्यता.आजच्या लेखात आपण हे सर्व पॅटर्न्‍स शोधून काढून त्यानुसार अंदाज सांगणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानाविषयी समजावून घेऊया.मानवी मज्जासंस्थेवर आधारित नेटवर्क न्यूरल नेटवर्क ही एआयची शाखा. आपण असं म्हणू शकतो की 1958 ला उदयाला येऊन स्थिर झाली. कॉर्नेल विद्यापीठातला मानसशास्त्रज्ञ रोझेनल्टार याने ‘एकस्तरीय न्यूरल नेट’ तयार केलं. म्हणजे एक इनपुट, मधला एक आकडेमोडीचा व वेिषणाचा स्तर व आउटपुट असे हे तीन भागातले नेटवर्क; परंतु याला अनेक प्रकारे मर्यादा आहेत. मानवी जीवनातील अनेक साधे प्रश्नसुद्धा हे एकस्तरीय नेटवर्क ज्याला ‘सिंगल लेअर पर्सेप्ट्रॉन’ म्हणतात ते सोडवू शकत नाही असं अनेकवेळा सिद्ध झाल्यानं एआयमधला लोकांचा रस खूप कमी झाला. 1969 मध्ये तर मिन्स्की या संगणकशास्त्रज्ञानं एआयच्या उपयुक्ततेविषयी गंभीर शंका उपस्थित केल्या.1986 मध्ये एडिम्बरा येथील अजून एका मानवशास्त्रज्ञानेच ‘बहुस्तरीय न्यूरल नेटवर्क’ची कल्पना मांडून क्रांती घडवली. या शास्त्रज्ञाचं नाव जेफरी हिंटन. तरीही पुढे 2008-09 र्पयत न्यूरल नेटवर्क्‍सचा फार बोलबाला नव्हता. क्रेडिट कार्ड फ्रॉड शोधणं, काही विशिष्ट औद्योगिक/ मॅन्युफॅरिंगमध्ये उपयुक्त वापर एवढाच एआयचा आवाका होता.2008-09 च्या सुमारास न्यूरल नेटवर्क्‍सने इमेज रेकनायझेशनमध्ये कार्यक्षमता व अचूकता लक्षणीयरीत्या वाढवली आणि गेल्या दहा वर्षात एआयची जी वाढ झाली आहे ती विलक्षण आहे.अ‍ॅन्ड्रय़ू इन्ग नावाचा एआयमधला विख्यात तज्ज्ञ तर म्हणतोय की, एआय ही उद्याची इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटीने जसं जगात स्थित्यंतर घडवलं तसं एआय हे प्रत्येक क्षेत्रात घडवणार आहे.न्यूरल नेटवर्कमध्ये आता अनेक स्तर (लेअर्स) असतात आणि प्रत्येक पातळीला ‘शिकण्याचा’ कार्यक्षमतेत वाढ होत जाते. ‘रिकरण्ट न्यूरल नेटवर्क’ ‘कंरट न्यूरल नेटवर्क’ वगैरे शब्द तुम्ही विशेषतर्‍ संगणकतज्ज्ञांकडून ऐकाल. थोडक्यात सांगायचं तर या शिकणार्‍या नेटवर्कला कोणतं ‘आर्किटेर’ असावं आणि त्यानं कसं शिकावं यावर हे वर्गीकरण आधारित आहे.मुळात एआयचा अर्थ आहे की मानवी मेंदूत जशी नियमांची यादी तयार होते तसं संगणकाने ‘शिकणं’ यावर एआयमध्ये एक विशेष भाग येतो. त्याला मशीन लर्निग (एआय) असं म्हणतात. यात दिलेल्या डाटाच्या आधारावर संगणक ‘शिकतो’. यातही सुपरवाइज्ड म्हणजे ज्यात काही मार्गदर्शन केलं जातं असे आणि असुपरवाइज्ड म्हणजे स्वतर्‍ शिकले जाणारे कोणत्याही मदतीशिवाय असे दोन मुख्य भाग येतात.जो भाग सगळ्यात ठळकपणे पुढे येतोस तो मशीन लर्निगचाही उपविभाग आहे. त्याला डीप क्लिनिंग असं म्हणतात. यात विशेषतर्‍ इमेज, व्हाइस इ. सर्व प्रकारच्या डाटामधून स्वतर्‍चं स्वतर्‍ शिकणं हे संगणक करू शकतो.इमेज रेकगनायझेशन ही डीप लर्निगची सुरुवात पण आहे आणि  यश सुद्धा आहे. एकूण काय तर डीप लर्निग हे एकूणच एआयची जनमानसात इमेज सुधारतंय हे नक्की!!लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.