शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
3
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
4
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
5
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
6
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
7
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
8
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
9
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
10
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
11
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
12
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
13
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
14
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
15
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
16
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
17
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
18
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
19
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
20
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट

143

By admin | Updated: June 4, 2015 14:31 IST

शॉर्टकट भाषेनं प्रेमाची अभिव्यक्ती आणि व्यक्त व्हायची पद्धतही पार बदलून टाकलीये!

सोशल  मीडियावर वापरली जाणारी भाषा ही जणू आजच्या तरुणाईची ‘कोड लँग्वेजच’ म्हणावी लागेल.  ती इंग्रजी असते की मराठी की हिंदी कुणास ठाऊक!
पण आजचे ‘तरुण’ इतरांच्या भाषेपेक्षा वेगळे आहेत हे नक्की! बाकीचे लोक त्याला आळस म्हणोत नाहीतर भाषेचे हाल म्हणोत पण या नवीन भाषेनं घेतलेला आकार काहीसा वेगळा आहे हे तर मान्य करावंच लागेल! व्हॉट्स अॅपच्या जमान्यात तासन्तास टाइप करत बोलत रहायचं तर पहिली अडचण येते स्पेलिंग्जची. मोठमोठी स्पेलिंग्ज टाइप करण्याचा अनेकांना कंटाळा. त्यात स्पेलिंगची मोडतोड अनेकांना स्टायलिशही वाटते आणि घरच्यांनी काही पाहिले तरी त्यांना कळत नाही हे वेगळेच!
आणि त्यातून तयार झाली एक आजची चॅटभाषा.
विशेषत: सोशल मीडियावर वापरली जाणारी ही नवीन भाषा. सोशल मीडियावर एक चक्कर जरी मारली तरी ही भाषा आपोआपच लक्षात येईल. 
फेसबुक(FB), व्हॉट्स अॅप, टि¦टर, यू टय़ूब  (YT)  ब्लॉग यांचा वापर तरुणाईच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालेला आहे. चॅटिंग करताना मोठमोठे स्पेलिंग टाइप करण्यापेक्षा शब्दांचे शार्टकट्स वापरले जातात. यामुळे कमीतकमी शब्दात अर्थपूर्ण मेसेज पाठवता येतो. तसेच वेळेची बचतदेखील होते असे अनेकांचे ठाम मत. 
यासंदर्भात अनेक तरुण मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारल्या. ते वापरत असलेले शब्द समजून घेतले. आणि त्यातून एक वेगळीच माहिती हाती आली. होतं काय की, या शॉर्टफॉर्ममध्ये लिहिण्याची इतकी सवय लागते की पूर्ण वाक्य, पूर्ण शब्द अनेकांना लिहिताच येत नाहीत. अनेकजण तर आता वर्गात नोट्सही या चॅटवाल्या भाषेतच घेऊ लागले आहेत. बी.कॉम. च्या दुस:या वर्षात असणारा स्वप्निल सांगतो की, रोजच्या चॅटिंगची इतकी सवय झालेली आहे.  कॉलेजमध्ये नोट्स लिहतानादेखील मी इंग्रजी शब्दांचे शॉर्टकट्स वापरतो. पण परीक्षेच्या वेळी चुकीचे स्पेलिंग लिहिल्यावर मार्क्‍स कट होतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे भान राखावे लागते.
मात्र अनेकजण फसतात इथेच. त्यांना फॉर्मल ईमेल्स, मेसेज एवढंच काय पण परीक्षेत पेपर लिहितानाही पूर्ण शब्द आठवत नाहीत. काहीजण तर इतके अॅडिक्ट की, आपल्याला ‘फॉर्मल’ लिहिता येतं याचाही विसर पडू लागला आहे.
शॉर्टकट मारण्याच्या नादात आपण भाषाच विसरतोय का याचं भान सुटू नये म्हणजे झालं!
 
 
प्रेमाची परिभाषाच या शॉर्टकट भाषेनं बदलवून टाकली आहे. आजची प्रेम व्यक्त करण्याची भाषाच निराळी आहे. 
त्या भाषेचं हे डिकोडिंग.
 
 * 143 हा नंबर म्हटला तर लव्ह बर्ड्सचा फेव्हरेट नंबर आहे. हल्ली प्रपोज करण्यासाठीदेखील ह्याच नंबरचा उपयोग केला जातो. म्हणून तर प्रपोज करताना म्हणतात-143 -  I love you.
 
* XBF -Ex-Boyfriend 
* XGF- Ex-GirlFriend  
* AML-All my love
*  2L8-Too LaTE 
* 2MR-Tomorrow 
* IMU-I Miss you 
*Jellz-Jealous 
* Rox-Rocks
 * chillax-chill & relax
 
       - दीपिका वाघ