इंटरनेट अँडिक्ट झालेल्या व्यक्तीच्या वर्तनात अनेक बदल होतात,त्या बदलांची ही एक नोंद.
एक चेकलिस्ट स्वत:साठी.
---------
इंटरनेटचा अतिवापर करणारी, अँडिक्ट झालेली व्यक्ती
खोटं बोलायला लागते. आपल्याला कसा कुठल्याच
कामासाठी वेळ नाही, आपण कसे बिझी याचे पाढे वाचते.
**
तरुण मुलांचा परफॉर्मन्स, त्यांची मार्क यात घसरण तर उघड दिसते. नोकरी करणार्यांचा कामावरील फोकस हलतो. कामात लक्ष लागत नाही, कामात मजा येत नाही. अनेकांना तर आपण ऑफिसला जातोय यात आपल्याला फुकटचं नेट वापरायला मिळणार याचाच मनोमन जास्त आनंद होतो. खराखुरा आनंद होण्याची भावना कमी होते.
**
नको नको असं स्वत:ला बजावत अनेक जण दोनच मिण्टासाठी लॉगइन होतात आणि दोन-दोन तास सोशल नेटवर्किंग साइटवर वाया घालवतात. आणि म्हणून पुढचे दोन तास चिडचिड करतात.
**
इंटरनेट अँक्सेस केलं, आपलं फेसबुक पेज उघडलं की अनेकांना कमालीचा आनंद होतो. तो त्यांचा दिवसभरातील सर्वाधिक समाधानाचा विषय असतो.
**
अनेक जण मित्रांना टाळायला लागतात. ‘अँम बिझी’ असं म्हणत मित्रांना कटवतात. आणि मग मित्र आपल्याला टाळतात म्हणत मित्र तोडले जातात.
**
अनेक जणांना वजन घटण्याचा किंवा वाढण्याचा त्रास एकाएकी सुरू होतो.
**
रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही, निद्रानाश होतो.
**
अनेकांना डोळ्यांची चुणचुण, डोकं जड, अंगदुखीचा त्रास असतो.
**
घरातल्यांशी भांडणं वाढतात.
**
अशी माणसं सतत स्वत:ला दोष देतात, मनात कुढतात.