शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

युवराजने पाकिस्तानविरोधातील खेळी कॅन्सर पीडितांना केली समर्पित

By admin | Updated: June 5, 2017 10:49 IST

पाकिस्तानविरोधात तुफानी खेळी करत विजयात महत्वाचा वाटा उचलणा-या युवराज सिंगने आपली खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली आहे

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 5 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील पाकिस्तानविरोधात खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी करत विजयात महत्वाचा वाटा उचलणा-या युवराज सिंगने आपली खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली आहे. सराव सामन्यावेळी आजारी असलेल्या युवराज सिंगची तब्बेत पहिल्या सामन्याआधी ठणठणीत झाली. मात्र यामुळे पाकिस्तानची तब्बेत मात्र पुरती बिघडली. युवराजने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 32 चेंडूत 53 धावा केल्या. युवराज सिंगच्या खेळीमुळे पाकिस्तानची मात्र चांगलीच दमछाक झाली. 
 
(युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!)
(युवराजला खेळताना पाहून मी क्लब क्रिकेटर असल्याचं वाटत होतं - विराट कोहली)
(महामुकाबल्यात भारत विजयी, पाकिस्तानचा 124 धावांनी उडवला धुव्वा)
 
युवराज सिंगने आपल्या  या खेळीवर आनंद व्यक्त केला. पाकिस्तानविरोधात मी चांगलं प्रदर्शन दाखवू शकलो याचा मला आनंद असल्याचं त्याने सांगितलं. तसंच युवराजने आपली ही तुफानी खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली. यावेळी त्याने लंडन दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांनाही आदरांजली वाहिली. युवराजने संघाला चांगली सुरुवात करुन देणारी सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनचंही कौतुक केलं.
युवराज सिंगच्या या या दमदार खेळीचं कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केलं आहे. "युवराजला खेळताना पाहून मला त्यांच्यासमोर क्लब क्रिकेटर असल्यासारखं वाटत होतं", असं विराट कोहली बोलला आहे. तसंच संघाची कामगिरी चांगली असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.
 
कर्णधार विराट कोहलीने सांगितलं की, "मला धावा करण्यात अडचण येत असताना युवराज सिंगने सर्व दबाव आपल्यावर घेतला. ज्याप्रकारे युवराज सिंग फटकेबाजी करत होता ते पाहून मी आवाक झालो होतो. युवराज सिंगच्या समोर मी एक क्लब क्रिकेटर असल्यासारखं मला वाटत होतं". नुकतंच आजारपणातून उठलेल्या युवराज सिंगने जबरदस्त खेळी केली, आणि त्यामुळेच त्याला "मॅन ऑफ द मॅच" म्हणून निवडण्यात आलं.
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर विराट कोहलीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विराटने सांगितलं की, "युवराज सिंगच्या आधी आमच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. मी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाबतीत समाधानी आहे. आमच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली, तसंच गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं. मला वाटतं क्षेत्ररक्षणात मात्र आम्ही कमी पडलो. फलंदाजी आणि गोलंदाजीला मी 10 पैकी 9 गुण देतो, पण क्षेत्ररक्षणात फक्त 6 गुण देईन. येणा-या पुढील सामन्यांमध्ये आम्ही क्षेत्ररक्षणात सुधार करु".