शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

यू मुंबाचा रोमांचक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 03:04 IST

पिछाडीवरून बाजी मारण्यात तरबेज असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला लढवय्या खेळाचे प्रदर्शन करताना पुणेरी पलटणचे कडवे आव्हान ३०-२७ असे रोमांचकरीत्या परतावले.

रोहित नाईक,  मुंबईपिछाडीवरून बाजी मारण्यात तरबेज असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला लढवय्या खेळाचे प्रदर्शन करताना पुणेरी पलटणचे कडवे आव्हान ३०-२७ असे रोमांचकरीत्या परतावले. यासह मुंबईकरांनी पुणेकरांविरुद्धची अपराजित मालिका कायम ठेवली असून उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक असलेल्या पुणे संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात बंगालला नमवणे अनिवार्य असेल.वरळी येथील सरदार वल्लभभाई स्टेडियममध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात सुरुवातीपासूनच अटीतटीचा खेळ झाला. पुणेकरांनी हुकमी खेळाडू मनजीत चिल्लरच्या अनुपस्थितीनंतरही दमदार खेळ करताना मुंबईकरांवर दबाव आणला. बचावावर जोर दिलेल्या पुणेरी पलटनने मुंबईच्या प्रमुख आक्रमकांना रोखत वर्चस्व राखले. मध्यंतराला १२-१२ अशी बरोबरी झाल्यानंतर मुंबईने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली खरी, मात्र त्यांना याचा आनंद फार काळ घेता आला नाही. पुण्याने जबरदस्त मुसंडी मारत २२व्या मिनिटाला मुंबईवर पहिला लोण चढवून १६-१४ अशी आघाडी घेतली. गेल्या काही सामन्यांत मुंबईसाठी निर्णायक ठरणारा रिशांक देवाडिगा या सामन्यात अपयशी ठरल्याने मुंबईकरांच्या कामगिरीवर परिणाम झाला. पुण्याच्या सचिन शिंगाडेने एक, तर कर्णधाराची जबाबदारी सांभाळलेल्या जसमेर सिंग गुलियाने तब्बल ३ सुपर टॅकेल करताना मुंबईची कोंडी केली. सुरेंदर सिंगने आक्रमक चढाया करताना पुण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. १९व्या मिनिटापासून थेट ३७व्या मिनिटांपर्यंत पुणेकरांनी सुपर टॅकल करताना मुंबईवर दबाव टाकला. मात्र ३९व्या मिनिटात रिशांकने बरोबरी साधून दिल्यानंतर लगेच अनुपने केलेल्या निर्णायक चढाईच्या जोरावर मुंबईने पुण्यावर लोण चढवून विजय निश्चित केला.