शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

यू मुंबाचा थरारक विजय

By admin | Updated: February 11, 2016 03:21 IST

संपूर्ण सामन्यात पिछाडीवर राहिलेल्या मुंबईकरांनी अखेरच्या दोन मिनिटांमध्ये पूर्ण सामनाच फिरवताना बंगळुरू बुल्सच्या हातातील सामना अक्षरश: खेचून घेतला. यू मुंबाने २९-२८ अशी थरारक

- रोहित नाईक , कोलकातासंपूर्ण सामन्यात पिछाडीवर राहिलेल्या मुंबईकरांनी अखेरच्या दोन मिनिटांमध्ये पूर्ण सामनाच फिरवताना बंगळुरू बुल्सच्या हातातील सामना अक्षरश: खेचून घेतला. यू मुंबाने २९-२८ अशी थरारक बाजी मारताना स्पर्धेतील तिसरा विजय मिळविला. बंगळुरूने मुंबईवर दोन लोण चढवले, तर मुंबईकरांनी बंगळुरूवर अखेरच्या मिनिटात निर्णायक लोण चढवून सामनाच फिरवला.अनूप कुमार, विशाल माने, सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थित यू मुंबाचा खेळ दडपणाखाली खालावला. अखेरच्या दोन मिनिटांपर्यंत बंगळूरू बुल्स २८-२४ असे आघाडीवर होते. बंगळुरूचा अमित राठी ‘डू आॅर डाय’ रेडमध्ये बाद झाला. तर, कर्णधार राकेश कुमार याने निर्णायक चढाई करताना मुंबईची पिछाडी २६-२८ अशी कमी केली. रिशांकने एका गुणाची कमाई केल्यानंतर जिवाने बंगळुरूचा कर्णधार सुरजित नरवालची निर्णायक पकड करून संघाला अखेरच्या मिनिटात २९-२८ असे आघाडीवर नेले. यानंतर रिशांकने अखेरच्या चढाईत केवळ वेळ घालवून मुंबईला विजय मिळवून दिला.मध्यंतराला बंगळुरूकडे २१-१० अशी भक्कम आघाडी होती. मात्र, मुंबईकरांनी हळूहळू गुण मिळवत अखेरच्या मिनिटात रोमांचक बाजी मारली. रिशांकने खोलवर चढाया करताना ४ बोनस गुणांसह एकूण ८ गुण मिळविले, तर राकेशने बचावावर भर दिला. बंगळुरूकडून बदली खेळाडू पवन कुमारने संघाला ९व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली.सुरुवातीला आमचा नियोजनानुसार खेळ झाला नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात ती कसर भरून काढली. जिवाने केलेली पकड आणि रिशांकने घेतलेले बोनस गुण निर्णायक ठरले. बचाव अधिक भक्कम केल्यानेच विजय मिळवू शकलो.- राकेश कुमार, कर्णधार, यू मुंबा