शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

योगेश्वरला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता

By admin | Updated: September 3, 2016 00:46 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये पहिल्याच लढतीत पराभव झाल्यानंतर टीकेचा सामना करावा लागलेला मल्ल योगेश्वर दत्तला लंडन आॅलिम्पिकसाठी रौप्य ऐवजी सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये पहिल्याच लढतीत पराभव झाल्यानंतर टीकेचा सामना करावा लागलेला मल्ल योगेश्वर दत्तला लंडन आॅलिम्पिकसाठी रौप्य ऐवजी सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमधील ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या योगेश्वरला सुवर्णपदक दिले जाईल. रौप्य जिंकणारा रशियाचा मल्ल बेसिक कुडुकोव्ह याच्यानंतर आता सुवर्णपदक विजेता तोगरुल असगारोव्ह हा देखील डोपिंगध्ये ‘फेल’ झाल्याने योगेश्वरला सुवर्णपदक बहाल करण्यात येईल.योगेश्वर लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच मल्ल ठरेल. लंडनमध्ये सुशीलकुमारने ६६ किलोगटात रौप्यपदक जिंकले होते.लंडनमध्ये कुडुकोव्ह हा सुवर्णपदकाच्या कुस्तीत अझरबैझानचा तोगरुल असगारोव्ह याच्याकडून पराभूत झाला होता. तो चार वेळेचा विश्वविजेता तसेच २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्यविजेता होता. नंतर रशियात झालेल्या कार अपघातात वयाच्या २७ व्या वर्षी त्याचे निधन झाले. कुडुकोव्ह पाठोपाठ असागारोव्ह डोपिंगध्ये ‘फेल’ झाला आहे. योगश्वर दत्तचीदेखील डोपिंग चाचणी केली जाणार असून तो पास झाल्यास सुवर्णपदकावर त्याचे नाव कोरण्यात येईल. ६० किलोगटात योगेश्वरला रौप्यपदक मिळाल्यानंतर त्याच्याकडून कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झालेला उत्तर कोरियाचा रिजोंग मियोंग हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. मात्र योगेश्वरला सुवर्णपदक मिळाल्यास रिजोंग मियोंगला रौप्य मिळेल. (वृत्तसंस्था)