शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

यासिर भेदक, इंग्लंडचीही घसरगुंडी

By admin | Updated: July 16, 2016 02:34 IST

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा मोहम्मद आमीरला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत विशेष छाप सोडता आली नाही.

लंडन : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा मोहम्मद आमीरला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत विशेष छाप सोडता आली नाही. दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत त्याला केवळ एक बळी बाद करता आला.त्याआधी, अष्टपैलू ख्रिस व्होक्सने कारकीर्दीत सर्वोत्तम कामगिरी करीत ७० धावांत ६ गडी बाद करताच कालच्या ६ बाद २८२ वरून पुढे खेळणाऱ्या पाकला इंग्लंडने ३३९ धावांत रोखले. प्रत्युत्तरात इंग्लंडचीे शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद २५३ अशी अवस्था झाली होती.आजचा खेळ थांबला त्यावेळी ३१ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या व्होक्सला स्टुअर्ट ब्रॉड (११) साथ देत होता. आमीरच्या चेंडूवर सुरुवातीला सुदैवी ठरलेल्या अ‍ॅलिस्टर कूकला (८१) त्यानंतर त्यानेच बाद केले. कुकने या खेळीदरम्यान सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक ९६०७ धावा फटकावण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला. कूकला २२ धावांवर मोहम्मद हाफिजने पहिल्या स्लिपमध्ये जीवदान दिले. पाकिस्तातर्फे फिरकीपटू यासिर शाह याने ६४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. त्याआधी पाकने ६ बाद २८२ वरुन पुढे खेळ सुरू केला. कर्णधार मिस्बाह उल हक याने शतकी(११४ धावा) खेळी केली. पण तो बाद होताच पाकचे सहा धावांत आणखी तीन फलंदाज बाद झाले. सर्फराज अहमद याने झटपट २५ धावा काढल्या. मोहम्मद आमीरने १२ धावांचे योगदान दिले.(वृत्तसंस्था)मिस्बाह बनला कसोटी शतक ठोकणारा वयोवृद्ध कर्णधारपाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत गुरुवारी शतक झळकविताच कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा सर्वाधिक वयाचा कर्णधार म्हणून त्याने विक्रमाची नोंद केली. नाबाद ११० धावा ठोकणाऱ्या मिस्बाहचे वय ४२ वर्षे ४७ दिवस इतके आहे. त्याने आॅस्ट्रेलियाच्या बॉब सिम्पसन यांना मागे टाकले. १९७७-७८ मध्ये सिम्पसन यांनी अ‍ॅडिलेडमध्ये भारताविरुद्ध ४१ वर्षे ३५९ दिवस वय असताना शतक ठोकले होते. संक्षिप्त धावफलकपाकिस्तान पहिला डाव सर्वबाद ३३९ (मिसबाह ११४, सर्फराज २५, व्होक्स ६-७०).इंग्लंड पहिला डाव ७१ षटकांत ७ बाद २५३ (अ‍ॅलिस्टर कुक ८१, रुट ४८, व्होक्स नाबाद ३१, यासिर शाह ५-६४, अली व मोहम्मद आमीर प्रत्येकी १ बळी.)