शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

त्या स्पर्धेतसुद्धा पाकिस्तानचा धुव्वा उडवत टीम इंडिया बनली होती वर्ल्ड चॅम्पियन!

By admin | Updated: June 18, 2017 10:20 IST

2007 साली झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकला होता हे तुम्हाला माहित असेलच, पण ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वीसुद्धा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - भारत आणि  पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीमुळे संपूर्ण देशभरात आज क्रिकेट फिव्हर चढला आहे. याआधी 2007 साली झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकला होता हे तुम्हाला माहित असेलच, पण ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वीसुद्धा एका जागतिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमने-सामने आले होते. ती स्पर्धा होती 1985 साली ऑस्ट्रेलियात झालेली बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या अंतिम लढतीत सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले होते. 
(लोकांच्या अपेक्षांची कल्पना आहे, मागचे रेकॉर्ड महत्वाचे नाहीत - विराट कोहली)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेटमधील आघाडीचे सात संघ सहभागी झाले होते. त्यावेळचा विश्वविजेता भारत, उपविजेता वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका अशा सात संघांमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम लढतीत भारताच्या समोर होता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान. एकतर्फी  झालेल्या अंतिम लढतीत कपिल देव, चेतन शर्मा आणि शिवरामाकृष्णन यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला 50 षटकात केवळ 176 धावाच करता आल्या होत्या.  त्यानंतर रवी शास्री आणि  श्रीकांत यांनी फटकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानचा 8 गडी राखून धुव्वा उडवत विजेता ठरला होता. तर अंतिम सामना आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या रवी शास्रीला बक्षीस म्हणून ऑडी कार देण्यात आली होती. ही ऑडी तेव्हा भारतात चर्चेचा विषय ठरली होती. 
(पाकिस्तानला बदला घेण्याची हीच सुवर्णसंधी - इमरान खान)