शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मेहनत घेऊ - प्रार्थना ठोंबरे

By admin | Updated: July 14, 2016 23:01 IST

आॅलिम्पिकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असतात. या स्पर्धेत पदक जिंकणे अवघड असले तरी ते जिंकण्यासाठी सानिया आणि मी खडतर मेहनत

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १४ - आॅलिम्पिकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असतात. या स्पर्धेत पदक जिंकणे अवघड असले तरी ते जिंकण्यासाठी सानिया आणि मी खडतर मेहनत घेऊ, अशी ग्वाही महाराष्ट्राची अव्वल टेनिस खेळाडू प्रार्थना ठोंबरे हिने गुरूवारी पुण्यात दिली.प्रार्थना रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला दुहेरी प्रकारात भारताची अव्वल खेळाडू सानियाच्या साथीने खेळणार आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आली असता पत्रकारांशी संवाद साधताना ती म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने मी आनंदी आहे. पण त्याहीपेक्षा जास्त आनंद झालाय तो सानियासोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याने. लहानपणापासून ती माझी आयडॉल आहे. आॅलिम्पिकच्या निमित्ताने तिच्यासोबत खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. आमच्यासमोर दिग्गज खेळाडूंचे आव्हान असेल. असे असले तरी, आम्ही पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू . पहिलेच आॅलिम्पिक असले तरी मी आत्मविश्वासाने खेळणार आहे.’’

स्पर्धेचा ड्रॉ अद्याप जाहीर झाला नसल्याने आमच्यासमोर कुणाचे आव्हान असेल, याची कल्पना नाही. मात्र, जगातील दिग्गज खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी हैदराबादमध्ये सानियाच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. सेरेना-व्हिनस या विल्यम्स भगिनींसह जगभरातील अनेक नामांकित खेळाडू तेथे असतील. सानिया ही जगातील अव्वल क्रमांकाची दुहेरीची खेळाडू आहे. तिच्यासह खेळण्याचा अनुभव मला मिळणार आहे, असेही प्रार्थनाने नमूद केले. या वेळी विशाल चोरडिया, सुंदर अय्यर, प्राथर्नाचे वडील गुलाब ठोंबरे, अमेय येरवडेकर उपस्थित होते. मूळची सोलापूरमधील बार्शीची असली तरी प्रार्थना आता वडिलांंसह हैदराबादला स्थायिक झाली आहे. तेथे ती सानिया मिर्झा अकादमीत सराव करते. सानियासह तिने नुकताच सरावाला प्रारंभ केला आहे. मागील १४ महिन्यांत तिने ११ विजेतीपदे पटकावली आहेत.

(सोलापूर - बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड )

सानियाचा फोरहॅण्ड जबरदस्त...सानियाची गणना सध्या महिला दुहेरीतील जगातील सर्वोत्तम खेळाडूंत होते. तिला अशा सर्वोच्च दर्जाचे यश मिळवून देण्यात ‘फोरहॅण्ड’च्या फटक्याचा मोठा वाटा आहे. तिच्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा फोरहॅण्डचा फटका आत्मसात करण्याची प्रार्थनाची इच्छा आहे. यासाठी सानियाचे वडील मार्गदर्शन करीत असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘‘इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादमध्ये सरावादरम्यान खेळातील कमकुवत बाबींवर मी लक्ष देत आहे. रिओतील वातावरण पूर्णत: भिन्न असेल. त्या परिस्थितीशी लवकर जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळाडू म्हणून आम्हाला वषर्षातील जवळपास ३० आठवडे जगातील वेगवेगळ्या भागात खेळावे लागते. त्यामुळे एखाद्या शहरातील वातावरणाशी लवकर जुळवून घेण्याची सवय करून घ्यावी लागते. रिओत दाखल झाल्यानंतर आम्हाला एकत्र सरावासाठी सुमारे एक आठवडा मिळेल.’’