शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कोलकाताचा दणदणीत विजय

By admin | Updated: April 14, 2017 00:49 IST

उमेश यादवची शानदार गोलंदाजी व कर्णधार गौतम गंभीरच्या नाबाद आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने

कोलकाता : उमेश यादवची शानदार गोलंदाजी व कर्णधार गौतम गंभीरच्या नाबाद आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. यासह पंजाबचे सलग तिसऱ्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवताना कोलकाताने ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. पंजाबने दिलेल्या १७१ धावांचे आव्हान कोलकाताने २ फलंदाजांच्या मोबदल्यात २१ चेंडू राखून पार केले. गंभीरने यावेळी एकप्रकारचा जुगार खेळताना सुनिल नरेनला सलामीला पाठवले. या आश्चर्यकारक निर्णयाचा कोलकाताला फायदा झाला. सुरुवातीला काही फटके खेळताना अडखळल्यानंतर नरेनने १८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकार ठोकत ३७ धावांचा तडाखा दिला. तसेच, गंभीरने संघाच्या विजयावर शिक्का मारताना ४९ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७२ धावा काढल्या. या दोघांनी ३४ चेंडूत ७६ धावांची तुफानी सलामी देत कोलकाताचा विजय निश्चित केला होता. रॉबिन उथप्पा (२६) आणि मनिष पांड्ये (२५*) यांनीही मोलाचे योगदान दिले. तत्पूर्वी, आक्रमक सुरुवात केलेल्या पंजाबने २० षटकात ९ बाद १७० धावांची आव्हानात्मक मजल मारली. उमेश यादवने मोक्याच्यावेळी पंजाबची मधली फळी कापताना ३३ धावांत ४ बळी घेतले. हाशिम आमला (२५) आणि मनन वोहरा (२८) यांनी पंजाबला ३१ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी सलामी दिली. मात्र, यानंतर त्यांचा डाव घसरला. कर्णधार मॅक्सवेल (२५), डेव्हिड मिल्लर (२८) आणि वृध्दिमान साहा (२५) यांनी पंजाबच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, उमेशच्या माऱ्यापुढे त्यांचा डाव मर्यादेत राहिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलककिंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ९ बाद १७० धावा (मनन वोहरा २८, डेव्हिड मिल्लर २८, वृध्दिमान साहा २५, ग्लेन मॅक्सवेल २५, हाशिम आमला २५; उमेश यादव ४/३३, ख्रिस वोक्स २/३०) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १६.३ षटकात २ बाद १७१ धावा (गौतम गंभीर नाबाद ७२, सुनिल नरेन ३७, रॉबिन उथप्पा २६, मनिष पांड्ये नाबाद २५; वरुण अ‍ॅरोन १/२३, अक्षर पटेल १/३६)