शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

विजय क्लबची दणदणीत बाजी

By admin | Updated: April 21, 2016 04:09 IST

विजय क्लब आणि अमर क्रीडा मंडळ या कसलेल्या संघांनी आपापल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना, आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात विजयी घोडदौड कायम राखली

मुंबई : विजय क्लब आणि अमर क्रीडा मंडळ या कसलेल्या संघांनी आपापल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना, आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात विजयी घोडदौड कायम राखली. त्याच वेळी ‘ब’ गटातून सिद्धेश्वर व दुर्गामाता संघांनी कूच केली.मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विजय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दादर येथील दत्ता राऊळ मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय क्लबने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात श्री साई क्रीडा मंडळाचा ४४-१२ असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच विजय संघाने १८-८ अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अजिंक्य कापरे आणि अमित चव्हाण यांनी तुफानी चढाया करताना प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदला, तर साई संघाच्या ज्ञानेश्वर चव्हाण आणि रवींद्र मांडवकर यांनी अनुक्रमे चढाया व पकडींच्या जोरावर अपयशी झुंज दिली. याच गटातील अन्य सामन्यात अमर क्रीडा मंडळाने सहज बाजी मारताना, साऊन कॅनरा स्पोटर््स क्लबचे आव्हान ३९-१७ असे संपुष्टात आणले. नितीन विचारे, सच्चिदानंद गावकर आणि रोहित उधटराव यांनी दमदार चढाया व पकडी करताना संघाच्या विजयात निर्णायक खेळ केला. पराभूत संघाकडून गौरव शेट्टी व स्वप्निल दौड यांनी संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. यानंतर, झालेल्या लढतीत विजय नवनाथने शानदार बाजी मारताना, जयभारत क्रीडा मंडळाला २७-१३ असे लोळवले, तर यंग विजय क्रीडा मंडळ संघाला वीर संताजी मंडळाविरुद्ध २६-३३ असा पराभव पत्करावा लागला.