शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विम्बल्डन टेनिस : सानिया- हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: July 3, 2016 19:58 IST

दुसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेने आपल्या घरच्या समर्थकांसमोर आपल्या नावाला साजेसा खेळ करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलिमॅनचा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ३ : दुसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेने आपल्या घरच्या समर्थकांसमोर आपल्या नावाला साजेसा खेळ करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलिमॅनचा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महिलांच्या गटात माजी विजेती अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या एनिका बेकचा पराभव करून आपल्या २२ व्या ग्रॅन्डस्लॅमकडे आगेकुच केली. तिसरे मानांकन असलेल्या पोलंडच्या अ‍ॅग्निज्स्का रंदावास्काने चेक गणराज्यची कॅटरिना सिनियाकोव्हाला पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. विम्बल्डन स्पर्धेत २०१३ मध्ये विजेता असलेल्या मरेने आॅस्ट्रेलियाच्या जॉनला तीन सेटमध्ये ६-३, ७-५, ६-२ गुणांनी नमविले. जोकाविच पराभूत झाल्यानंतर आता या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये मरेच अग्रमानांकन खेळाडू राहिला आहे. मरेला चौथ्या फेरीत २१ वर्षीय स्पेनच्या निक किर्गियोस किंवा फेलिसियानो लापेज यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढावे लागणार आहे. महिलांच्या गटात सेरेनाने एनिकाला ५१ मिनिटात ६-३, ६-० असा पराभव करून आपला ३०० वा विजय नोंदविला. तिसरे मानांकित असलेली पोलंडच्या रंदावास्काने कॅटरिनाला सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-१ गुणांनी नमविले. नववे मानांकन असलेल्या मॅडिसन कीने फ्रान्सच्या अलाइज कोनेंटला ६-४, ५-७, ६-२ गुणांनी पराभूत केले. सानिया-हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्सर्लंडची मार्टिना हिंगीसने जर्मन जोडी अ‍ॅना लेना फ्रिडसॅम आणि एल. सेजमंड जोडीला ६-२, ७-५ असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानिया-हिंगीसने हा लढत एक तास २१ मिनिटांत जिंकली. दुसरीकडे पुरुष दुहेरीत भारताचा रोहण बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने सहावी मानांकित जोडी स्लोवाकियाचा आंद्रेज मार्टिन आणि चिलीचा हेंस केस्टिलो या जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-५, ६-२ असे नमविले.