शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विम्बल्डन : सेरेना विलियम्स अंतिम फेरीत, सानिया - हिंगीसचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 19:36 IST

महिला दुहेरीमध्ये मात्र धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीला उपांत्यपुर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला

सेरेना विलियम्स अंतिम फेरीतलंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने अपेक्षित कामगिरी करताना विम्बल्डन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर सेरेनाने रशियाच्या एलेना वेस्नीनाचा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला. त्याचवेळी अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांचे आव्हान उपांत्यपुर्व फेरीत धक्कादायकरीत्या संपुष्टात आले.एकतर्फी झालेल्या सामन्यात सेरेनाना जबरदस्त वर्चस्व राखताना केवळ ४८ मिनिटांमध्ये बाजी मारली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना नियंत्रण राखलेल्या सेरेनाने सलग दोन सेटमध्ये वेस्नीनाला ६-२, ६-० असे लोळवले. या विजयासह जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून सेरेना एक पाऊल दूर आहे. पहिल्या सेटमध्ये २ गेम जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या वेस्नीनाचा दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या धडाक्यापुढे काहीच निभाव लागला नाही. यावेळी सेरेनाने ताकदवर फटक्यांच्या जोरावर वेस्नीनाला एकही गेम जिंकण्याची संधी न देता दिमाखात अंतिम फेरी गाठली. (वृत्तसंस्था).......................................सानिया - हिंगीस पराभूत...महिला दुहेरीमध्ये मात्र धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीला उपांत्यपुर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. पाचव्या मानांकीत तिमिया बाबोस (हंगेरी) आणि यारोस्लावा श्वेदोवा (कजाकिस्तान) या जोडिने शानदार खेळ करताना एक तास नऊ मिनिटांच्या लढतीत ६-२, ६-४ असा विजय मिळवला. सुरुवातीपासूनच झगडणाऱ्या सानिया - हिंगीस आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरल्या. याआधीच मिश्र दुहेरीतून स्पर्धेबाहेर गेलेल्या सानियाचा विम्बल्डन प्रवास या पराभवानंतर संपुष्टात आला आहे.