शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विम्बल्डन : मरे वि. बर्डीच कांँटे की टक्कर

By admin | Updated: July 7, 2016 18:25 IST

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे आणि झेक प्रजासत्ताकचा टॉमस बर्डीच यांच्यामध्ये विम्बल्डन ओपन ग्रँडास्लॅमची रोमांचक उपांत्य लढत होईल

विम्बल्डन : त्सोंगा व पोइली यांचे आव्हान संपुष्टात लंडन : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे आणि झेक प्रजासत्ताकचा टॉमस बर्डीच यांच्यामध्ये विम्बल्डन ओपन ग्रँडास्लॅमची रोमांचक उपांत्य लढत होईल. तब्बल ५ सेटमध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मरेने फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाचे तगडे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. तर दुसरीकडे बर्डीचने सहज कूच करताना फ्रान्सच्याच लुकास पोइलीचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवला. तब्बल ३ सेट ५४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मरेला पहिले दोन सेट जिंकल्यानंतरही त्सोंगाविरुद्ध पुर्ण ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. त्सोंगाने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना ०-२ अशा पिछाडीवरुन सलग दोन सेट जिंकताना सामना २-२ असा बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मात्र मरेने तुफानी खेळ करताना त्सोंगाला कोणतीही संधी न देता ७-६, ६-१, ३-६, ४-६, ६-१ असा विजय मिळवला. दुसरीकडे एकतर्फी झालेल्या सामन्या बर्डीचने केवळ एक तास ५५ मिनिटांत बाजी मारताना लुकास पोइलीचे आव्हान संपुष्टात आणले. सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना बर्डीचने पोइलीला आपला खेळ करण्याची एकही संधी न देता ७-६, ६-३, ६-२ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत मरे विरुध्द बर्डीच अशी रोमांचक लढत होणार असून दोन्ही खेळाडू एकूण १५व्यांदा एकमेकांसमोर येतील. आतापर्यंतच्या १४ लढतीत मरेने ८ वेळा बाजी मारली असून ६ वेळा बर्डीचने विजय मिळवला आहे. (वृत्तसंस्था)............................................घरच्या प्रेक्षकांचा मिळत असलेल्या जबरदस्त पाठिंब्याच्या जोरावर मरेने १२व्या मानांकीत त्सोंगाविरुध्द वर्चस्व मिळवताना सातव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत बलाढ्य रॉजर फेडरर आणि मिलोस राओनिक यांच्यात लढत होईल.