शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विम्ब्लडन : सिलिचचे आव्हान मोडून फेडररची उपांत्य फेरीत धडक

By admin | Updated: July 6, 2016 21:45 IST

माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ६  : माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तब्बल ५ सेटपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्य लढतीत क्रोएशियाचा जागतिक क्रमवारीत ९व्या स्थानी असलेल्या मरिन सिलिच याचे कडवे आव्हान फेडररने ६-७(४-७), ४-६, ६-३, ७-६(११-९), ६-३ असे झुंजाररीत्या परतावले. उपांत्या सामन्यात फेडररपुढे कॅनडाच्या मिलोस राओनिकचे तगडे आव्हान असेल.तब्बल चार वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्यासाठी फेडररला यंदाची विम्बल्डन एक सुवर्णसंधी आहे. अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि स्टॅन वावरिंका यांचा धक्कादायक पराभव तसेच, स्पेनचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालने दुखापतीमुळे घेतलेली माघार यामुळे फेडररला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जाते. यावेळी त्याला ब्रिटनचा जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या अँण्डी मरेकडून अडसर ठरु शकतो. मात्र उपांत्यपुर्व फेरीत सिलिचने जबरदस्त खेळ करताना दिग्गज फेडररला चांगलेच झुंजवले.सिलिचचा धडाका पाहून फेडररसह त्याच्या पाठिराख्यांवरही प्रचंड दबाव आला होता. मात्र आपल्याला चॅम्पियन खेळाडू का म्हणतात हे सिध्द करताना फेडररने अखेरपर्यंत कडवी झुंज देताना सिलिचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर फेडररने आपला दर्जा दाखवताना सिलिचला पिछाडीवर टाकण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करताना तब्बल तीन तास १७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाची मेजवानी दिली. आक्रमक खेळ झालेल्या या सामन्यात एकूण ५० एस शॉट मारण्यात आले. त्यापैकी फेडररने २७ अप्रतिम एस मारले. ......................................राओनिक उपांत्य फेरीत अन्य लढतीत अव्वल खेळाडू आणि संभाव्य विजेत्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला धक्का देणाऱ्या अमेरिकेच्या सॅम क्वेरीला सहाव्या मानांकीत मिलोस राओनिकने ६-४, ७-५, ५-७, ६-४ असे नमवले. या विजयासह राओनिकने दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.