शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेसह नव्याने सुरुवात करणार - एम. एस. धोनी

By admin | Updated: February 16, 2016 03:29 IST

चेन्नई सुपर किंग्ज हा भूतकाळ झाला. आता राइजिंग पुणे सुपरजायंट्स या नव्या संघासोबत जोडलो गेलो आहे. त्यामुळे आगामी आयपीएल सत्रात जुने विसरून, नव्याने जोमात सुरुवात करणार

शिवाजी गोरे,  नवी दिल्लीचेन्नई सुपर किंग्ज हा भूतकाळ झाला. आता राइजिंग पुणे सुपरजायंट्स या नव्या संघासोबत जोडलो गेलो आहे. त्यामुळे आगामी आयपीएल सत्रात जुने विसरून, नव्याने जोमात सुरुवात करणार असल्याचे, पुणे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्रकार परिषदेत सांगितले. राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या जर्सी अनावरण कार्यक्रमात धोनी बोलत होता. या वेळी संघ मालक संजीव गोएंका उपस्थित होते. धोनी म्हणाला, ‘गेली आठ वर्षे चन्नई सुपर किंग्ज संघाबरोबर मी जोडलो होतो. आठ वर्षांचा काळ काही कमी नाही. त्या संघाबरोबर निर्माण झालेले भावनिक संबंध विसरता येणार नाहीत. आम्ही व्यावसायिक खेळाडू आहोत. त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष आता देण्यात काही अर्थ नाही, पण आता मी नवीन पुणे संघाबरोबर जोडलो गेलो आहे. त्यामुळे नवीन संघ मालकांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास माझ्या नवीन सर्व संघ सहकाऱ्यांबरोबर १०० टक्के सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे.’ रैनाबाबत विचारले असता, धोनी म्हणाला, ‘रैना धोनीविरुध्द खेळणार नसून, तो त्याच्या संघासाठी खेळणार आहे. त्यामुळे तोसुद्धा विजयी होणासाठी प्रयत्न करणारच. काहीही झाले तरी हा खेळ आहे. आयपीएलमुळे युवा क्रिकेटपटूंना संधी मिळत आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबरोबर खेळताना त्यांचा आत्मविश्वास वाढतोय. ३५ ते ४० हजार प्रेक्षकांसमोर खेळल्याने दबावास सामोरे जाण्याची क्षमता वाढते, असेही धोनीने सांगितले.संघ मार्गदर्शकांबाबत : स्टिफन फ्लेमिंग यांच्याबरोबर मी गेली आठ वर्षे आहे. त्यांच्यात सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता आहे. प्रत्येक खेळाडूबाबत लहान-सहान गोष्टींचा विचार करून त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, यात त्यांचा हातखंडा आहे. आम्हा दोघांची विचारसरणी सकारात्मक असल्यामुळे, आमचे ट्युनिंग चांगले जमते.