शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

धमकी कोणाला?

By admin | Updated: September 27, 2015 00:13 IST

भारताने डिसेंबर महिन्यात पाकविरुद्ध मालिका न खेळल्यास भविष्यात टीम इंडियासोबत खेळणार नसल्याची धमकी पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी दिली.

लखनौ : भारताने डिसेंबर महिन्यात पाकविरुद्ध मालिका न खेळल्यास भविष्यात टीम इंडियासोबत खेळणार नसल्याची धमकी पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी, शेजारी देशाशी क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. शहरयार यांची धमकी बीसीसीआयसाठी आहे की आयसीसीसाठी हेच समजण्यापलीकडचे असल्याचे शुक्ला म्हणाले.एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘‘शहरयार यांना नियम माहिती नसावेत. पीसीबीला आयसीसीचे नियम बंधनकारक आहेत. बहिष्काराची धमकी असेल तर आयसीसी त्यांच्यावर दंड आकारेल. सुरक्षेच्या मुद्द्यावरून इंग्लंड किंवा आॅस्ट्रेलिया तर दूरच बांगलादेशदेखील पाक दौऱ्यावर यायला तयार नाही. पीसीबी सामन्याची आणि खेळाडूंच्या सुरक्षेची हमी घेऊ शकते का? पाकसोबत मालिकेची तयारी केली तरी आम्ही सरकारकडे मंजुरीसाठी जाऊ. तेथे अनेक कारणास्तव अडथळे येतील. अशा वेळी डिसेंबरमध्ये मालिकेचे आयोजन शक्य नाही.’’बीसीसीआय प्रमुख सर्वानुमते व्हावाबीसीसीआयचा नवा प्रमुख सर्वानुमते व्हावा अशी सूचना करीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले. सर्वानुमते नवा अध्यक्ष होणे हीच दालमियांना खरी श्रद्धांजली असेल, असेही ते म्हणाले. सचिनपेक्षा सेहवाग सरसशुक्ला यांच्यासोबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर उपस्थित होते. शुक्ला म्हणाले, ‘‘अनेक बाबतीत सेहवाग सचिनपेक्षा सरस आहे.’’बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली याची नियुक्ती झाल्याबद्दल दोन्ही खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. संघटनेच्या प्रमुखपदी खेळाडू आल्यास परिस्थितीची जाणीव होण्यास मदत मिळत असल्याचे मत दोघांनी व्यक्त केले. -----सेहवाग, गंभीर राजकारणात येण्यास इच्छुकसेहवाग आणि गंभीर हे राजकारणात प्रवेशास इच्छुक दिसले. शुक्ला यांनी राजकारण प्रवेश करण्याचा दोघांनाही प्रस्ताव देताच सेहवाग म्हणाला, की भविष्यात तुमच्या प्रस्तावावर विचार करेन. सचिनला राज्यसभेत घेतले मलादेखील राज्यसभेवर घ्या, अशी टिप्पणी वीरूने नोंदविली. गंभीरचे मत मात्र वेगळे होते. तो म्हणाला, ‘‘राज्यसभेपेक्षा मी लोकसभेची निवडणूक लढविण्यास प्राधान्य देईल. जनता आम्हाला लोकसभेत बसताना पाहू इच्छिते का, याचा वेध घेता येईल.’’-----------शहरयार यांना नियम माहिती नसावेत. पीसीबीला आयसीसीचे नियम बंधनकारक आहेत. बहिष्काराची धमकी असेल तर आयसीसी त्यांच्यावर दंड आकारेल. सुरक्षेच्या मुद्द्यावरून इंग्लंड किंवा आॅस्ट्रेलिया तर दूरच बांगलादेशदेखील पाक दौऱ्यावर यायला तयार नाही.- राजीव शुक्ला(वृत्तसंस्था)