शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा साकलेन मुश्ताक त्याच्या पत्नीला कपाटात लपवतो

By admin | Updated: February 23, 2015 15:26 IST

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साकलेन मुश्ताक याने १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पत्नीला चक्क कपाटात लपवले होते. खुद्द साकलेन मुश्ताकनेच या गंमतीशीर आठवणीचा क्रिकेटप्रेमींसोबत शेअर केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २३ -  सध्या सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये क्रिकेटपटूंसोबत त्यांची पत्नी किंवा प्रेयसीला राहू द्यायला परवानगी हवी की नको यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. वर्ल्डकपमध्ये पत्नीसोबत राहावी यासाठी क्रिकेटपटूही काय करतील याचा नेम नाही. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साकलेन मुश्ताक याने १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पत्नीला चक्क कपाटात लपवले होते. खुद्द साकलेन मुश्ताकनेच या गंमतीशीर आठवणी क्रिकेटप्रेमींसोबत शेअर केल्या आहेत. 
एका वेबसाईटसाठी लिहीलेल्या लेखात पाकचा माजी क्रिकेटपटू साकलेन मुश्ताकने १९९९ च्या वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा दिला. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आम्हाला पत्नीला सोबत नेण्याची परवानगी दिली होती. दौरा चांगला जात होता आणि वेळ मिळाल्यावर आम्ही सहकुटुंब भटकंतीही करायचो. मात्र सेमीफायनलपूर्वी बोर्डाने आम्हाला पत्नींना सोबत ठेवता येणार नाही असा आदेश काढला. बोर्डाच्या या निर्णयानंतर मी रुमवर आलो. पत्नी सानाला सांगितले तू परत जाणार नाही, या दौ-यात मला तुझी साथ हवी आहे असे तिला सांगितल्याचे साकलेन सांगतो. 
आम्ही ज्या हॉटेलवर जायचो तिथे माझ्यापूर्वी माझी पत्नी चेक इन करायची. मी आल्यावर ती माझ्या रुममध्ये येऊन राहायची.  संघ मॅनेजर किंवा अन्य खेळाडू आले की तिला कपाटात लपवून द्यायचो असे साकलेनने स्पष्ट केले. अझहर महमूद आणि मोहम्मद युसूफला या प्रकाराची माहिती होते असे त्याने म्हटले आहे. हा किस्सा सांगताना साकलेन म्हणतो, एकदा अझहर महमूद  आणि मोहम्मद युसूफ माझ्या खोलीत आले व जोरजोरात माझ्यावर हसू लागले. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघू लागलो. शेवटी माझी पत्नी माझ्यासोबतच राहते हे माहित असल्याचे त्यांनी सांगितले व आता आम्ही आल्यावर तिला कपाटात लपवू नकोस असे सांगून दोघेही माघारी परतले.