शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

रहाणे आणि कोहलीच्या नेतृत्वाबद्दल काय म्हणाले इयान चॅपेल

By admin | Updated: March 29, 2017 20:20 IST

अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 -  अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्त्व करतो, तर कोहलीच्या नेतृत्वाची स्टाईल त्यापेक्षा वेगळी आहे. अशा दोन्ही वृत्तीचे कर्णधार एकाच वेळी संघात असल्याने टीम इंडिया भाग्यवान आहे, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.धरमशाला कसोटीत जखमी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. भारताने ही कसोटी आठ गड्यांनी जिंकून मालिका २-१ ने खिशात घातली. कसोटीत रहाणेने संयमाने नेतृत्व केले, शिवाय दुसऱ्याडावात आक्रमक फलंदाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.चॅपेल म्हणाले, रहाणेने धरमशाला कसोटीत कर्णधार म्हणून खरोखर उत्कृष्ट कामगिरी केली. खऱ्या कर्णधाराची नेतृत्वाची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी असल्याची जेव्हा कल्पना तुम्हाला असते, अशावेळी त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हानदेखील असते. आपण काय करावे? मुख्य कर्णधाराचीच पद्धत कायम ठेवून नेतृत्व करावे की स्वत:च्या स्टाईलने नेतृत्व करावे, हा प्रश्न असतो. रहाणेने अतिशय सोप्या पद्धतीने सामना पार पाडला शिवाय जिंकून दाखविला. यातून त्याच्या नेतृत्वगुणांचा परिचय घडला. रहाणेने दुसऱ्या डावात भारताचे दोन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतरही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता, पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूत नाबाद ३८ धावा ठोकल्या.रहाणे कर्णधार म्हणून संयमी आहे. तो आपल्या फलंदाजीतून आक्रमकपणा दाखवून देतो. तुम्ही काय करीत आहात यावर संघातील खेळाडूंचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि तुम्हाला फक्त चांगली खेळी साकारण्याची गरज असते. संघाचे मनोधैर्य यातून आपोआप उंचावते. कोहली आणि रहाणे यांचे कौशल्य भिन्न आहे. पण धरमशालात रहाणेने ज्या पद्धतीने नेतृत्व केले तेवाखाणण्याजोगे आहे, असेही चॅपेल म्हणाले.