शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिथे सांगाल तिथे आम्ही खेळू : युवराज

By admin | Updated: April 22, 2016 02:30 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या तीव्र विरोधामुळे आयपीएलसामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याबाबत निर्णय झालेला असताना ‘आमचे काम केवळ खेळणे असून, जेथे सांगाल तिथे आम्ही खेळू,’

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या तीव्र विरोधामुळे आयपीएलसामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याबाबत निर्णय झालेला असताना ‘आमचे काम केवळ खेळणे असून, जेथे सांगाल तिथे आम्ही खेळू,’ असे स्पष्ट मत भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने व्यक्त केले.मुंबईतील खार रोड येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात युवराजने आपले मत व्यक्त केले. यावेळी भारताचा स्टार फुटबॉलपटू रॉबिन सिंग देखील उपस्थित होता. यावेळी युवी म्हणाला, ‘आयपीएलमुळे कधीच कोणाचे वाईट होणार नाही. मात्र, मी एक खेळाडू असून, याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही आणि तसा मला अधिकारही नाही. आम्ही क्रिकेट खेळतो आणि तेच आमचे काम आहे. त्यामुळे जेथे सांगाल तेथे आम्ही खेळू.’टी-२० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर अद्याप क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीच्या पुनरागमनाकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. याविषयी युवीने सांगितले, ‘मी आता दुखापतीतून सावरलो असून, माझ्या पायाचे प्लास्टर काढण्यात आले आहे. आगामी ६ मे ला होणाऱ्या सामन्याद्वारे पुनरागमनाचा माझा निर्धार आहे. शुक्रवारी मी हैदराबादला रवाना होणार असून, संघासह माझा सराव सुरू होईल. त्यामुळे ६ मे च्या सामन्यासाठी मी सज्ज असेल, अशी अपेक्षा करतो आणि विश्वास देतो की मी संघासाठी माझा सर्वोत्तम खेळ करेल.’ ‘शिखर धवन महत्त्वाचा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूच्या फॉर्ममध्ये चढ-उतार होत असतो. (क्रीडा प्रतिनिधी) ते ‘नो बॉल्स’ पडले नसते तर...टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्याविषयी युवी म्हणाला, ‘ कधी कधी काही खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत आहे. माझ्यामते ‘त्या’ दोन नोबॉलमुळे आम्ही विंडीजविरुद्ध अपयशी ठरलो. पण विंडीज संपूर्ण स्पर्धेत चांगले खेळले. त्यांना त्यांच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल.’