शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो - विराट कोहली

By admin | Updated: July 10, 2017 13:31 IST

पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर फोडलं आहे.

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. 10 -  एव्हिन लेव्हिसने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव केला. या  पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर फोडलं आहे. पहिल्या टी 20 सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने विराट म्हणाला, वेस्ट इंडिजने आमच्या पेक्षा सरस खेळाचे पदर्शन केलं. चांगल्या सुरुवातीनंतर आमच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी नांगी टाकली. क्षेत्ररक्षणावेळीही भारतीय खेळाडूंनी झेल सोडल्याचा फटका बसला. वेस्ट इंडिजच्या संघानी आमच्यापेक्षा सरस खेळ केला. कालची भारतीय संघाची कामगिरी पाहता आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावां केल्या होत्या. पण एव्हिन लेव्हिसने (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या वेळी विकेट गमावल्यामुळे भारत 190 धावां करु शकला. हाणामारीच्या षटकात महत्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे 20-30 धावा कमी निघाल्या. 
पुढे बोलताना कोहली म्हणाला, आलेल्या संधी सोडल्या नंतर तुम्ही विजयाचे दावेदार नाही होऊ शकत. फलंदाजांनी विजयाचा पाया रचायला हवा होता. दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली पण एका फलंदाजांनी 80-90 धावांची खेळी करायला हवी होती. फलंदाजी प्रमाणे आमच्या गोलंदाजांनीही निराशजनक कामगिरी केली. टी 20 च्या बदल्या प्रारुपामध्ये अनेक वाईट दिवसाला सामोरं जावं लागू शकतं. वेस्ट इंडिज टी 20 चा चांगला संघ आहे. सध्या आपला संघ परिवर्तनाच्या दारात उभा आहे. संघात अनेक बदल होतं आहेत. त्यामुळे विजय-पराजयाचा सामना आपल्याला कारावा लागेल. 
आणखी वाचा -
"लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा
कोचपदाच्या शर्यतीत शास्त्री आघाडीवर
काल झालेल्या एकमेव टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रीत केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या होत्या. 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एव्हिन लेव्हिसची (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) शतकी खेळी व त्याने मार्लोन सॅम्युअल्ससह (नाबाद ३६) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला