शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही संघात जास्त बदल करीत नाही : ब्राव्हो

By admin | Updated: May 13, 2015 23:20 IST

चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये आपले सातत्याने वर्चस्व राखले आहे आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनुसार त्यांच्या यशाचे गुपित

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये आपले सातत्याने वर्चस्व राखले आहे आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनुसार त्यांच्या यशाचे गुपित हे ते त्यांच्या मुख्य खेळाडूंना संघात कायम ठेवतात आणि संघात जास्त बदल करीत नाही.गेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागणाऱ्या चेन्नई संघाचे आयपीएल गुणतालिकेत आता १३ सामन्यात ८ विजय असून ते अव्वल स्थानावर आहेत. ब्राव्होने त्यांचा संघ आव्हान पत्करण्यास नेहमी सज्ज असतो, असेही सांगितले.ब्राव्हो म्हणाला, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही संघात काटछाट आणि बदल करीत नाहीत. खेळाडूंचा लिलाव असो अथवा अंतिम संघाची निवड, त्यात व्यवस्थापन चांगले काम करीत आहे. ते मुख्य खेळाडूंसोबत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मैत्री आणि संघात एकजूटता असते व हे खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला संघ चांगला करायचा असेल तर तुम्हाला चॅम्पियन संघ बनावे लागेल. तुम्ही कोणत्याही संघाविरुद्ध खेळले तर त्यांना पराभूत करावे लागेल. निश्चितच आम्ही अव्वल दोन स्थानात राहू इच्छितो.आयपीएल आठमध्ये १२ डावांत एकूण १९ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्राव्हो अव्वल स्थानी आहे.अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंच्या कारकीर्दीला वळण देण्याचे श्रेय आयपीएलला देताना ब्राव्होने निश्चितच ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचा मार्ग असल्याचे ठासून सांगितले.ब्राव्हो म्हणाला, ‘‘आयपीएल फक्त वेस्ट इंडीजमधीलच नव्हे, तर सर्व खेळाडूंची मदत करीत आहे. भारतीय खेळाडूंनाही फायदा होत आहे. शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांना पाहा. हे सर्वच आयपीएलच्या यशामुळे चमकले आहेत. खेळाडूंना मिशेल जॅन्सन आणि डेल स्टेनसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याची संधी मिळत आहे. हे अशा खेळाडूंसोबत आयपीएलमध्ये जितके जास्त खेळतात तसा त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आत्मविश्वास उंचावतो आणि ते आणखीन जास्त चांगले खेळाडू बनतात.’’