शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही खराब क्रिकेट खेळलो नाही : राहुल द्रविड

By admin | Updated: May 15, 2015 01:05 IST

राजस्थान रॉयल्सचे मेंटर राहुल द्रविडने आज त्यांच्या संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या विद्यमान पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना वगळता

मुंबई : राजस्थान रॉयल्सचे मेंटर राहुल द्रविडने आज त्यांच्या संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या विद्यमान पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना वगळता खराब क्रिकेट खेळलो नसल्याचे म्हटले आहे.द्रविड म्हणाला, ‘‘आम्ही सलग पाच सामने जिंकून शानदार सुरुवात केली. आमचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले. त्यानंतर पुन्हा दोन सामने गमावले. आम्ही आरसीबीविरुद्धचा एक सामना सोडता खराब क्रिकेट खेळलो नाही. त्या सामन्यात आम्ही १३0 धावांतच सर्व बाद झालो होतो. दुसरा सामना कमी अंतराने गमावला.’’ रॉयल्स सध्या आयपीएल गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना १६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायचे आहे आणि हा सामना त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे.द्रविडने आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सची स्तुती केली. त्याने मुंबईविरुद्ध ५९ चेंडूंतच नाबाद १३३ धावा ठोकल्या होत्या. तो म्हणाला, ‘‘सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतानाही मी त्याच्याप्रमाणे खेळण्याचा विचार करू शकत नाही. आक्रमक कसे खेळायचे हे प्रथम विव्ह रिचडर््सने शिकवले आणि सनथ जयसूर्या व रमेश कालुवितरणा यांनी पहिल्या १५ षटकांत फलंदाजी करणे शिकवले.’’बॅट आणि चेंडूंत अधिक समतोल असण्याची मागणी करताना द्रविडने टी-२0 सामन्यातदेखील प्रतिषटक दोन उसळते चेंडू टाकण्याची परवानगी देण्यात येण्याच्या प्रस्तावाची पाठराखण केली. तो म्हणाला, ‘‘सध्या जर गोलंदाजाने त्याच्या कोणा एका षटकात पहिलाच चेंडू उसळता टाकल्यास फलंदाज त्याच्यावर दबाव आणू शकतो. कारण फलंदाजास त्या षटकात गोलंदाज आणखी एक बाऊन्सर टाकू शकणार नाही हे माहीत असते. त्याचप्रमाणे सीमारेषेचे अंतरही मोठे असायला हवे.’’वीरेंद्र सेहवागचे उदाहरण देताना द्रविडने सर्वच स्वरूपांत सेहवागने एकसारखीच फलंदाजी केल्याचे म्हटले. तो म्हणाला, ‘‘वीरू सर्वच स्वरूपात एकसारखाच खेळतो.’’ (वृत्तसंस्था)