शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यासाठी धोनीवर होता दबाव?

By admin | Updated: January 9, 2017 17:38 IST

महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या राजीनाम्याबद्दल अनेक चर्चांना उधाण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या राजीनाम्याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं आहे. धोनीने स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता आणि त्याला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं असा खळबळजनक आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी केला आहे. रविवारी रांचीमध्ये वर्मा यांनी हा आरोप केला. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृ्त्त दिलं आहे.
 
वर्मांनी केलेल्या आरोपानुसार, झारखंड क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमिताभ चौधरी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील संबंध काही दिवसांपासून खराब झाले होते. चौधरी हे 2 जानेवारीपर्यंत झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यांदरम्यान चौधरी आणि धोनीचे संबंध चांगलेच ताणले गेले. 
 
गुजरात आणि झारखंड संघादरम्यान झालेल्या रणजी उपांत्य सामन्यात चौधरी यांनी धोनीकडे खेळण्याचा आग्रह धरला होता. मात्र, खेळण्यास नकार देत धोनीने संघासोबत मार्गदर्शक म्हणून राहण्याची तयारी दाखवली.  धोनी मार्गदर्शन करत असतानाही झारखंड संघाचा या सामन्यात पराभव झाला होता. ही संधी साधून चौधरी यांनी 4 जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना फोन केला आणि धोनीला त्याच्या भविष्यातील प्लानबाबत विचारणा करण्यास सांगितलं. 
 
चौधरी यांच्या सांगण्यावरूनच प्रसाद यांनी धोनीला फोन केला आणि  भविष्यातील प्लानबाबत विचारणा केली. अशी विचारणा होणे हे धोनीसाठी धक्कादायक होते.  त्यामुळे धोनीने त्याचदिवशी तडकाफडक राजीनाम्याचा निर्णय घेतला.