शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘पूश-अप’ ऐवजी नमाज पढण्याची पाक क्रिकेटपटूंना ताकीद

By admin | Updated: October 26, 2016 19:58 IST

सामना जिंकल्यानंतर मैदानावर ‘पूश-अप’करीत आनंद साजरा करण्याची पद्धत चुकीची ठरवित पाकिस्तानच्या संसदेने (नॅशनल असेम्ब्ली)ही कृती देशाची प्रतिमा मलिन करणारी ठरविली आहे.

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. 26 -  सामना जिंकल्यानंतर मैदानावर ‘पूश-अप’करीत आनंद साजरा करण्याची पद्धत चुकीची ठरवित पाकिस्तानच्या संसदेने (नॅशनल असेम्ब्ली)ही कृती देशाची प्रतिमा मलिन करणारी ठरविली आहे. असे करण्याऐवजी मैदानाव नवाफिल(नमाज) पढण्याची ताकीद पाक क्रिकेट बोर्डामार्फत खेळाडूंना दिली आहे. पाकचा कर्णधार मिस्बाह उल हक याने सर्वात आधी ही कृती केली होती. सामना जिंकल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना त्याने मैदानावर चक्क पूश-अप केले होते. त्याचे अनुकरण अन्य खेळाडूंनीदेखील केले. पीसीबी खेळाडूंच्या या कृतीवर नाराज आहे. यापुढे असे करायचे नाही, असे स्पष्ट निर्देश खेळाडूंना बोर्डाने दिले. पाकमधील वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार बोर्डाने खेळाडूंच्या कृतीवर तीव्र नाराजी दर्शवित अखेर या कृतीतून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, असा सवाल केला. जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत शतक साजरे केल्यानंतर मिस्बाहने मैदानावर पूश- अप केले होते. बुधवारी झालेल्या पीसीबीच्या कार्यसमितीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला.पाकच्या नॅशनल असेंम्ब्लीतही या मुद्दावर रोष व्यक्त करण्यात आला. संसदेने बोर्ड अध्यक्ष नजम सेठी यांना खेळाडूंकडून असे वर्तन पुन्हा घडू नये अशी ताकीद दिली. हा मुद्दा इंटर प्रॉव्हिन्शियल कमिटीच्या काही खासदारांनी उपस्थित करीत यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याकडे लक्ष वेधले होते. या घडामोडीनंतर पीसीबीने खेळाडूंना ताकीद देत असे वर्तन नकरण्याची सूचना केली. पाकमधील सत्ताधारी मुस्लिम लीगचे (नवाज) खा. राणा मोहम्मद अफझल यांनी पाक क्रिकेट संघ असे वर्तन करीत काय संदेश देऊ इच्छितो, असा प्रश्न विचारला होता. दुसरे खा. चौधरी नजीब अहमद यांनी तर विजयाचा जल्लोष करताना खेळाडूंनी मैदानावर नमाज पढण्याची सूचना केली. पूश-अपऐवजी मैदानावर नमाज पढणे कधीही चांगले, असे ते म्हणाले. पीसीबी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले,‘४० वर्षांच्या मिस्बाहने आपला फिटनेस पटवून देण्यासाठी असे केले असावे.’ त्याआधी पाकचा अनुभवी फलंदाज युनूस खान याने सामना जिंकल्यानंतर सैनिकाच्या शैलीत ‘सॅल्यूट’ ठोकला होता. सेठी यांनी खेळाडूंकडून भविष्यात अशी चूक होणार नाही, असा विश्वास खासदारांना दिला.(वृत्तसंस्था)