शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

धरमशालामध्ये वॉर्नरच्या कामगिरीबाबत उत्सुकता

By admin | Updated: March 24, 2017 23:40 IST

आॅस्ट्रेलियाचा विचार करता कसोटी मालिका संपण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काही जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाजांना अनुकूल

आॅस्ट्रेलियाचा विचार करता कसोटी मालिका संपण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काही जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाजांना अनुकूल धरमशाला येथील परिस्थितीमुळे सामन्याचा निकाल चार दिवसांत लागेल. वेगवान गोलंदाजांना सहायक असलेल्या वातावरणामुळे फिरकीपटूंना थोडी विश्रांती मिळेल, अशी आशा आहे. दोन तुल्यबळ संघांदरम्यानच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे हिमालयालाही हादरे बसतील, असे मत व्यक्त होत आहे. या मालिकेत आॅस्ट्रेलियाने सर्वतोपरी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. त्यात मग फलंदाज असो, फिरकीपटू असो की वेगवान गोलंदाजा असो. मायदेशात खेळण्याचा विचार करता भारताला लाभ मिळण्याची शक्यता आहे, पण तरी यजमान संघ दावेदार नाही. मायदेशात खेळतानाही भारतीय संघ दडपणाखाली असल्याचे दिसले. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आॅस्ट्रेलिया संघ या मालिकेत स्वत:चा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरला. आॅस्ट्रेलिया या मालिकेत विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर असेल तर त्याचे सर्व श्रेय त्यांच्या फलंदाजांना जाते. आघाडीच्या व तळाच्या फलंदाजांदरम्यान रेनशॉ व हँडसकोंब यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. जीवनात केवळ फिरकीपटूंनाच खेळत असल्याप्रमाणे ते या मालिकेत फिरकी गोलंदाजी सहजपणे खेळत आहेत. वळणाऱ्या चेंडूवर प्रतीक्षा करीत ते सहजपणे खेळण्यात यशस्वी ठरले आहेत. स्टीव्ह स्मिथ व शॉन मार्श चांगले खेळाडू आहेत, पण या खेळपट्टीवर डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. त्याला या दौऱ्यात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारताला या लढतीत सुरुवातीपासून आक्रमक खेळ करावा लागेल. विशेषत: वेगवान गोलंदाजांना आपल्या वेगाने आॅस्ट्रेलियन फलंदाजांना चकित करावे लागेल. कुठलेही दडपण न बाळगता त्यांना खेळावे लागेल. परिस्थिती शमी व भुवीसाठी उपयुक्त असेल तर भारतीय संघात पाच गोलंदाजांचाही समावेश राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रीडा पानावर विराट कोहलीला खेळातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे संबोधणारे वृत्त मला पचनी पडले नाही. अशा वृत्तामुळे आॅस्ट्रेलियाच्या कृष्णकृत्यांना आणखी नवे व्यासपीठ मिळणार आहे. (पीएमजी)क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि क्रिकेट जगतही या बाबीचे हकदार नाही, हे मात्र खरे. (टीसीएम) - रवी शास्त्री