शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विरेंद्र सेहवाग निश्चित - सूत्र

By admin | Updated: July 11, 2017 12:17 IST

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समितीला विरेंद्र सेहवागने चांगलंच प्रभावित केलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून अंदाज लावले जात आहेत. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री सर्वात पुढे असल्याचा अंदाज जवळपास सर्वांनीच वर्तवला होता. सोमवारी क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतली. जवळपास चार तास चाललेल्या या मॅरेथॉन सेशनमध्ये विरेंद्र सेहवाग बाकीच्या उमेदवारांवर भारी पडल्याचं चित्र आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समितीला  विरेंद्र सेहवागने चांगलंच प्रभावित केलं आहे. विरेंद्र सेहवागने समितीसमोर आपला पुढील 2019 वर्ल्ड कपपर्यंतचा आपला प्लान मांडला होता. 
 
आणखी वाचा 
प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर
शास्त्री प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेतून बाहेर? विराटपुढे दोन पर्याय
विराटमुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर
 
क्रिकेट सल्लागार समिती भारतीय कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे. विराटशी चर्चा केल्यानंतरच अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे. याचा अर्थ क्रिकेट सल्लागार समिती विराट कोहलीकडून मंजूरी घेणार असा नाही.  
 
‘वेळ आल्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. प्रशिक्षकपद निवडीबाबत आम्ही कोणतीही घाई करणार नसून सर्वांचे समान मत आम्हाला अपेक्षित आहे. कर्णधार कोहलीशी चर्चा करून निर्णय घेऊ,’ असं भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्य सौरभ गांगुलीने मुलाखतीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. 
 
भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात मुख्य शर्यत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, आता सीएसीच्या भूमिकेनंतर असे दिसत नाही. प्रशिक्षकपदाच्या अंतिम निवडीची घोषणा पुढे ढकलणे आणि सेहवागची प्रत्यक्ष मुलाखत दोन तास रंगणे, यावरून अनेक चर्चा रंगत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये केवळ सेहवाग एकटाच प्रत्यक्षपणे बीसीसीआय सेंटरवर उपस्थित होता.
 
यामुळेही शास्त्री यांची पीछेहाट झाल्याची चर्चा रंगत आहे. शास्त्री यांनी सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता, परंतु जेव्हा बीसीसीआयने अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ जुलैपर्यंत वाढवली, तेव्हा शास्त्री यांनी लगेच आपला अर्ज भरला. शास्त्री यांचे कोहलीसह चांगले संबंध असून संघ निर्देशक म्हणून त्यांची मागची कामगिरी चांगली आहे. दरम्यान, शास्त्री यांचे कोहलीसह चांगले संबंध असले तरी सीएसी सदस्य गांगुलीसह त्यांचे मतभेद आहेत आणि हीच त्यांची मुख्य अडचण ठरू शकते.
 
दुसरीकडे, सेहवागचे सर्व खेळाडूंसह आणि मुख्य म्हणजे सीएसी सदस्यांसह खूप चांगले संबंध आहेत. परंतु, प्रशिक्षक म्हणून तो पिछाडीवर आहे. आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मेंटॉर राहिला, मात्र संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. उच्चस्तरावरील प्रशिक्षकपदाचा सेहवागकडे कोणताही अनुभव नाही.