शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा फॉर्म संघासाठी निर्णायक ठरणार

By admin | Updated: June 1, 2017 00:29 IST

क्रिकेटची एक शानदार स्पर्धा सुरू होत आहे. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण प्रदेशात स्पर्धा खेळविली जात आहे. इंग्लंडमधील

- सौरभ गांगुली - क्रिकेटची एक शानदार स्पर्धा सुरू होत आहे. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण प्रदेशात स्पर्धा खेळविली जात आहे. इंग्लंडमधील हवामान गेल्या काही दिवसांपासून प्रसन्न असल्याने या स्पर्धेचा साक्षीदार या नात्याने मी उत्साही बनलो. मी समालोचक या नात्याने स्पर्धेत पुनरागमन करणार. आगामी काही दिवसांसाठी रोमहर्षक खेळाचा आनंद उपभोगण्याची आम्हा सर्वांना संधी मिळणार, अशी खात्री वाटते.अलीकडे उल्लेखनीय सुधारणा करणारे चांगले संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी तर २०१३ च्या स्पर्धेपासून वेगवान सुधारणा केली. इंग्लंडमध्ये यंदा खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या असतील. त्यामुळे प्रत्येक संघ दावेदार या नात्याने स्पर्धेत खेळताना दिसेल.भारताने सराव सामन्यात धडाका केला. विशेषत: गोलंदाजी अधिक भेदक जाणवली. सर्व पाचही गोलंदाज पूर्णपणे लयीमध्ये असून आयपीएलसारख्या दीर्घ स्पर्धेत खेळूनही कुणाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही. इंग्लंडमधील हवामान देखील खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यास उपयुक्त आहे. भारतासाठी फलंदाजी मोलाची ठरावी. विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो. त्याचा हा फॉर्म भारतीय संघाचे स्पर्धेतील भविष्य निश्चित करणार आहे. व्यवस्थापनाला मात्र फलंदाजीतील चौथ्या स्थानावर काही सुधारणा करावी लागेल. युवराजची तब्बेत ठिक नाही. पण बांगला देशविरुद्ध तो मधल्या फळीत खेळला असता तर बरे झाले असते. तरीही पाकविरुद्ध सलामी लढतीआधी फिटनेस सिद्ध करण्याची त्याच्याकडे पुरेशी संधी असेल. दिनेश कार्तिक देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे. तरीही टीम इंडियाच्या थिंक टँकची युवीला पसंती असेल कारण तो ‘मॅचविनर’ आहे.’इंग्लंडने द. आफ्रिकेत झालेल्या तीन वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार खेळ केला. तिसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजी ढेपाळली. तथापि यजमान संघाला स्पर्धेपूर्वी तयारीसाठी चांगली संधी मिळाली असे म्हणावे लागेल. आयपीएलचा हिरो असलेला बेन स्टोक्स जबर फॉर्ममध्ये आहे. त्याची फलंदाजी देखील ताकदवान आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीवर इंग्लिश व्यवस्थापन खूश असावे. पाकिस्तान संघाच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा असतील. विश्वस्तरावरील स्पर्धेत पाकने भारताविरुद्ध मात्र नेहमीच संघर्ष केला. यावेळी इभ्रत शाबूत राखण्यासाठी पाकला देखील कामगिरी सुधारणे क्रमप्राप्त झाले आहे. (गेमप्लान)