शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा ‘भावनिक’ सूर

By admin | Updated: March 2, 2016 02:52 IST

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारताचा स्टाइलिश फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशमध्ये आयोजित कार्यक्रमात गायनाची झलक दाखविली.

ढाका : आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारताचा स्टाइलिश फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशमध्ये आयोजित कार्यक्रमात गायनाची झलक दाखविली. जाहीर कार्यक्रमात त्याने जो वादा किया वो निभाना पडेगा. या गाण्याने त्याने मनातील भावना तर व्यक्त केली नाहीना ? अशी चर्चा सुरु झाली आहे. आशिया चषक स्पर्धेत झालेल्या पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात निर्णायक ४९ धावांची खेळी करुन भारताला विजयी केल्यानंतर भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय संघाला ढाका येथे एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यावेळी विराटने मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचे ‘जो वाद किया वो निभाना पडेगा’ हे गाणे गायले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बांगलादेशची एक गायिका करीत होती. त्यावेळी तीच्या सोबत स्टेजवर विराटला बोलावण्यात आले. यावेळी विराटने हे सदाबहार गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. विराट व त्याची मैत्रीण अनुष्का कोहली यांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अपघाताने त्याच्या वाट्याला आलेल्या या गाण्यांच्या शब्दांना वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी देखील आपल्या गायकीची कला साद केली. दखल घेण्याची बाब म्हणजे काहीदिवसांपुर्वीच नव्याने येत असलेल्या ‘मेरठिया गँगस्टर’ चित्रपटातही रैनाने आपल्या गायकीची कला सादर केली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ युवराजने शूट केला असून विराटने इंस्टाग्राम व फेसबुकवरही कार्यक्रमाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. (वृत्तसंस्था)