शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा दुसऱ्या आठवड्यात निर्णय

By admin | Updated: April 2, 2017 02:21 IST

रायझिंग पुणे सुपर जायन्टस् पुणे संघाचा खेळाडू असलेला रविचंद्रन आश्विन हा हर्नियामुळे आयपीएलचे संपूर्ण सत्र खेळणार नाही. मुरली विजय, लोकेश राहुल हेदेखील खांद्यावरील उपचारासाठी बाहेर पडले आहेत.

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली आयपीएल-१०मध्ये खेळणार की नाही, याचा निर्णय दुसऱ्या आठवड्यात होईल. तो खांद्याच्या दुखापतीमुळे उपचार घेत असल्याचे बीसीसीआयचे मत आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत अखेरच्या सामन्यास मुकलेल्या कोहलीच्या फिटनेसची स्थिती सांगताना बीसीसीआयने विराट रांचीत झालेल्या दुखापतीवर सध्या उपचार घेत असल्याचे सांगितले. खेळण्याचा निर्णय दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याने कोहलीच्या पुनरागमनाची तारीख मात्र सांगता येणार नाही. भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलपासून यंदा दूर राहणार आहेत. काहींना सुरुवातीच्या सामन्यातून विश्रांती हवी आहे. भारतात सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक पार पडल्यानंतर, या खेळाडूंना जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी विश्रांती हवी आहे. फिट राहण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारतीय संघ विजेता असून, यंदा स्पर्धा पुन्हा जिंकण्याचा निर्धार व्य़क्त केला आहे.आश्विन आयपीएल खेळणार नसल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले. लोकेश राहुलला इंग्लंडमध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे. मुरली विजयच्या डाव्या मनगटाला दुखापत असल्याने त्याच्यावरही शस्त्रक्रिया होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि गुजरात लॉयन्सचा रवींद्र जडेजा हे सध्या विश्रांती घेत असल्याने सुरुवातीचे काही सामने खेळणार नाहीत. उमेश आणि जडेजा यांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड निश्चित मानली जात आहे. या दोघांनाही प्रत्येकी दोन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली. जडेजाच्या बोटाला दुखापत असल्याने चेंडू फिरविणे कठीण जात आहे. उमेशच्या कंबरेत तसेच मांडीत लचक भरली आहे.रायझिंग पुणे सुपर जायन्टस् पुणे संघाचा खेळाडू असलेला रविचंद्रन आश्विन हा हर्नियामुळे आयपीएलचे संपूर्ण सत्र खेळणार नाही. मुरली विजय, लोकेश राहुल हेदेखील खांद्यावरील उपचारासाठी बाहेर पडले आहेत.मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील त्याचा सहकारी हार्दिक पांड्या यांना मात्र आयपीएल खेळण्यास फिट घोषित करण्यात आले आहे.