शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विराटला धोनीकडून मिळणा-या सल्ल्यामुळे संघाचा फायदा - अय्याझ मेमन

By admin | Updated: February 3, 2017 17:00 IST

नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत मोक्याच्या क्षणी क्षणी विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या सल्ल्याचा फायदा झाला.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत मोक्याच्या क्षणी  क्षणी विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या सल्ल्याचा फायदा झाला. स्वत: विराटनेही महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत असल्याची कबुली दिली. पण काही जणांना विराटने अशा प्रकारे धोनीचा सल्ला घेणे आवडलेले नाही. सोशल मीडियावरुन यावर टीका करण्यात आली. 
 
वास्तविक धोनी आणि विराटमध्ये चांगला समन्वय आहे. त्यांच्या या समन्वयाचा संघाला फायदा होत आहे. मैदानावरील अशा घटनांकडे  बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे असे मत लोकमतचे एडिटोरीयल अॅडव्हायझर अय्याझ मेमन यांनी व्यक्त केले. 
 
अय्याझ मेमन यांनी भारतीय क्रिकेटला भेडसावणा-या विविध मुद्यांचा आढावा घेतला. सध्याच्या निवड समितीकडे अनुभवाची कमतरता आहे त्यावर ते म्हणाले की, चांगला क्रिकेटपटू चांगला निवडकर्ता असेलच असे नाही. निवड समिती सदस्याचे काम क्रिकेटपटूची माहिती गोळा करुन कामगिरीच्या आधारावर निवड करणे आहे असे त्यांनी सांगितले. 
 
राहुल द्रविडची अंडर -19 संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करणे हा अत्यंत चांगला निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षकाचे काम संघ बांधून ठेवायचे असते असे मेमन म्हणाले. क्रिकेटच्या तीन प्रकारांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ही पद्धत भारताला मानवणारी नसल्याचे त्यांनी सांगितले. टी-20 क्रिकेटवर टीका होत असली तरी, टी-20 मुळे क्रिकेटचा स्तर उंचावल्याचे त्यांनी सांगितले. 
 
पूर्वी कसोटी क्रिकेटला मोठा प्रेक्षकवर्ग होता. लोक मोठया संख्येने सामने पाहायला स्टेडियममध्ये जायचे. त्यातुलनेत आता कसोटी सामन्याच्यावेळी स्टेडियम रिकामे दिसतात. यावर मेमन म्हणाले की, आताही कसोटी क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही. लोक टीव्ही, मोबाईल इंटरनेट या माध्यमातून कसोटी क्रिकेट पाहिले जाते असे त्यांनी सांगितले.