शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

विराट कोहलीच अव्वल

By admin | Updated: April 6, 2017 04:16 IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या कारकिर्दीमध्य आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या कारकिर्दीमध्य आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. क्रिकेटचे बायबल समजल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’ या वार्षिकांकाच्या मुखपृष्ठावर विराट कोहली अवतरला आहे. ‘विस्डेन’ क्रिकेटर्स अलमनॅक पुस्तिकेने विराट कोहलीला २०१६ या वर्षातील जगातील सर्वोत्कृष्ट क्रि केटपटू जाहीर केले आहे.विराट कोहलीची गेल्या वर्षभरातील कामगिरी त्याच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली. कोहलीने सलग चार कसोटी सामन्यांत चार द्विशतके ठोकण्याचा पराक्र म देखील याच वर्षात केला. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरु द्ध कसोटी मालिका ंिजंकल्या. कोहलीने यंदाच्या हंगामात २५९५ धावा ठोकल्या असून त्यात सात शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. या धडाकेबाज कामगिरीने सहकाऱ्यांनाही आत्मविश्वास मिळतो. आॅस्ट्रेलियाविरु द्धच्या कसोटी मालिकेत कोहलीच्या धावांना ब्रेक लागला होता. तिन्ही कसोटीत तो अपयशी ठरला होता. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला एका कसोटीस मुकावे लागले.दरम्यान, कोहलीला ‘विस्डेन’ने जागतिक अव्वल खेळाडूचा सन्मान दिला, तर आॅस्ट्रेलियाच्या एल्स पेरी हिला जगातील अव्वल दर्जाची महिला क्रि केटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. मिस्बाह-उल-हक, युनूस खान, बेन डकेट, ख्रिस वोक्स यांचाही ‘क्रि केटर आॅफ द इअर’ म्हणून गौरव करण्यात आला. काही दिवसांआधी कोहलीला बीसीसीआयचा ‘पॉली उम्रिगर’ पुरस्कारदेखील मिळाला होता. (वृत्तसंस्था)>विस्डेनने गौरविलेले क्रिकेटपटूरिकी पाँटिंग (२००३), शेन वॉर्न (२००४), अ‍ॅण्ड्रयू फ्लिन्टॉफ (२००५), मुथय्या मुरलीधरन (२००६), जॅक कालिस (२००७), वीरेंद्र सेहवाग (२००८ आणि २००९), सचिन तेंडुलकर (२०१०), कुमार संगकारा (२०११), मायकेल क्लार्क(२०१२), डेल स्टेन (२०१३), कुमार संगकारा (२०१४), केन विलियम्सन (२०१५)आणि विराट कोहली (२०१६).