शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली आणि रवी शास्त्रींमुळे धोनीचा कसोटीला रामराम ?

By admin | Updated: December 31, 2014 12:17 IST

महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी देत सर्वांनाच धक्का दिला असला तरी धोनीच्या निवृत्तीमागे विराट कोहली आणि रवि शास्त्री कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी देत सर्वांनाच धक्का दिला असला तरी धोनीच्या निवृत्तीमागे विराट कोहली आणि रवि शास्त्री कारणीभूत असल्याची चर्चा आहे. ड्रेसिंग रुममध्ये कोहली आणि शास्त्री यांची जवळीक वाढत असल्याने धोनीच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता असे समजते. 
मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यावर महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली आहे. धोनीची निवृत्ती तडकाफडकी असली तरी त्याने निवृत्ती संदर्भात यापूर्वीच संकेत दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय ड्रेसिंग रुममधील बदलत्या समीकरणांमुळे धोनीने हा निर्णय घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात विराट कोहली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांची जवळीक वाढली होती आणि याचा अनुभव पहिल्या कसोटी सामन्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघ आक्रमक खेळ करत होता आणि मैदानात भारतीय खेळाडू व ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये खटकेही उडत होते.  या सर्व गोष्टी धोनीच्या विरोधात जात होत्या. धोनी हा मैदानावर शांत आणि संयमी कर्णधार म्हणून ओळखला जातो.  धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यांच चांगले संबंध होते. त्यामुळे संघ धोनीच्या कार्यपद्धतीनुसार चालत होता. मात्र  गेल्या काही महिन्यांपासून संघातील अनेक निर्णयांमध्ये रवी शास्त्रींचा हस्तक्षेप वाढला होता. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला काटे की टक्कर दिल्यानंतर कोहली - शास्त्री हे सूत्र राबवण्याची मागणी वाढली होती. साहजिकच धोनीला यामध्ये अडथळा आणायचा नव्हता व त्याने कसोटी क्रिकेटलाच अलविदा केले अशी चर्चा जोर धरु लागली आहे.