शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विराटची सचिन आणि सलमान खानवर मात

By admin | Updated: June 26, 2017 08:51 IST

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने अभिनेता सलमान खान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत अभिनेता सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रासारख्या सेलिब्रेटींना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. फेसबुकवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ३५,७२५, ७१९ इतकी झाली आहे. याआधी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडचा दबंग खान सलमान अव्वल स्थानावर होता. पण विराटने त्यालाही मागे टाकलं आहे. या यादीत सलमान दुसऱ्या स्थानावर, दीपिका पादूकोण तिसऱ्या स्थानावर आणि प्रियांका चोप्रा चौथ्या स्थानी आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे. 
काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये विराटने अव्वल स्थान मिळवलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या यादीतही विराटने अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. फेसबुकच्या 35,434,956 फॉलोअर्सबरोबरच ट्विटरवर कॅप्टन कोहलीचे 16 दशलक्ष आणि इन्स्टाग्रामवर 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.  यावर्षी झालेल्या टेस्ट मॅचमध्ये तसंच नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील विराटच्या खेळीमुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने उत्तम खेळी केली होती पण पाकिस्तान विरोधात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या सामन्यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनाम दिला. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या वादामुळे विराटवर क्रिकेटविश्वातून तसंच फॅन्सकडून टीका झाली होती. पण त्याचा कोणताही परिणाम विराटच्या फॉलोअर्सच्या संख्येवर झाला नाही, असं चित्र बघायला मिळतं आहे. 
काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वात जास्त मानधन असलेल्या सेलिब्रेटींच्या यादीतही विराटला स्थान देण्यात आलं होतं. या यादीत विराट 89व्या क्रमांकावर आहे. 22 मिलीअन डॉलर इतकं त्याचं वार्षीक उत्पन्न असल्याने त्याला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळालं आहे. तसंच गेल्या वर्षीच्या "एएसपीएन वर्ल्ड फेम 100" मध्ये विराट 13 व्या स्थानी होता. 
सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजमध्ये व्यस्त आहे. या सीरिजमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामान्यात विराटची शानदार खेळी क्रिकेटप्रेमींना बघायला मिळाली.  विराट कोहलीने या सामन्यात 87 रन्सचा आकडा गाठला.