शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदर बनला प्रोफेशनल बॉक्सर

By admin | Updated: June 30, 2015 02:09 IST

आॅलिम्पिक कांस्य विजेता भारतीय बॉक्सर विजेंदरसिंग याने सोमवारी प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवताच भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला गेला.

लंडन : आॅलिम्पिक कांस्य विजेता भारतीय बॉक्सर विजेंदरसिंग याने सोमवारी प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवताच भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला गेला. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या विजेंदरने आयओएस स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून क्वीन्स बेरी प्रमोशन्ससोबत बहुवर्षीय व्यावसायिक करार केला. यानुसार तो मिडलवेटमध्ये पहिल्या वर्षी किमान सहा लढती खेळेल. प्रमोटर्स मिळाल्यास आपण व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पाय रोवू, अशी इच्छा विजेंदरने फ्लायड मेवेदर आणि मॅनी पॅकियावो यांच्यातील लढतीनंतर व्यक्त केली होती. आज एका मोठ्या पत्रकार परिषदेत त्याने या आशयाच्या करारावर स्वाक्षरी केली. हरियाणातील भिवानी गावात जन्मलेला ३९ वर्षांचा विजेंदर यापुढे मॅन्चेस्टर शहरात वास्तव्यास असेल. विजेंदरने २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, २००६ च्या आशियाडमध्ये कांस्य, २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्य आणि २००९ च्या विश्व हौशी चॅम्पियनशिप, तसेच २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २००९ साली मिडलवेट गटात तो विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला, हे विशेष.(वृत्तसंस्था)