शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली

By admin | Updated: March 8, 2017 12:30 IST

बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगलेच भडकले

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंकडून एकमेकांवर जोरदार शेरेबाजी पाहायला मिळाली. रंगतदार झालेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगलेच भडकले होते. स्मिथने जे काही केलं त्यावर मैदानाबाहेरूनही चांगलीच टीका होत आहे. 
 
दुस-या डावात भारताच्या 188 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या कांगारू संघाची 68 वर तीन बाद अशी अवस्था होती. भारतासाठी  21वं षटक जलदगती गोलंदाज उमेश यादवने टाकलं. या षटकातील तिस-या चेंडूवर स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणा-या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरवलं. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडुंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे तिस-या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राइकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला. पण तेथून तो ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रूमकडे पाहात होता, आणि  तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करत होते. पंचांच्याही हे ध्यानात आलं ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असं करू शकत नाही असं ते त्याला म्हणाले. दरम्यान भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर ऑस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितलं.
 
स्मिथ तंबूत परतत असताना विराटसह भारताच्या काही खेळाडूंनी त्याच्यावर शेरेबाजी केली. मात्र स्मिथच्या या वागण्यावर क्रिकेटच्या मैदानावरूनच नव्हे तर मैदानाबाहेरूनही जोरदार टीका होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही स्मिथची खिल्ली उडवत ड्रेसिंग रूम रिव्ह्यू सिस्टिम असं ट्विट करून स्मिथला लक्ष्य केलं आहे.