शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : महाराष्ट्रकन्या ललिता बाबरचे दहाव्या स्थानी समाधान

By admin | Updated: August 16, 2016 05:15 IST

जिम्नॅस्ट दीपा करमाकरला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर, भारतीयांच्या सर्व आशा अ‍ॅथलेटिक्समध्ये ३००० मीटर स्टिपचेस प्रकारात ललिता बाबरकडे लागल्या होत्या.

रिओ : जिम्नॅस्ट दीपा करमाकरला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर, भारतीयांच्या सर्व आशा अ‍ॅथलेटिक्समध्ये ३००० मीटर स्टिपचेस प्रकारात ललिता बाबरकडे लागल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत ललिता तब्बल १०व्या स्थानी राहिल्याने पुन्हा एकदा भारतीयांच्या पदरी निराशाच आली. शिवाय ललिताच्या कामगिरीवर खास करून महाराष्ट्रामध्ये विशेष चर्चा होती. मात्र, अंतिम फेरीत तिचा काहीच निभाव न लागल्याने सर्वांचाच हिरमोड झाला.साताऱ्याची ललिता अ‍ॅथलेटिक्स फायनलमध्ये पोहोचणारी पी. टी. उषा यांच्यानंतर केवळ दुसरीच धावपटू ठरली होती. उषा यांनी १९८४ लॉस एंजेलिस आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये तिने २२.७४ सेकंदाची वेळ नोंदवत दहावे स्थान मिळवले. त्याच वेळी बहरीनची रुथ जेबेटने (८ मिनिटे ५९.७५ सेकंद) जबरदस्त वर्चस्व राखताना सहज सुवर्ण पटकावले, तर केनियाच्या हीविन कियेंग जेपकेमोई (९:०७.१२) आणि अमेरिकेच्या एमा कोबर्न (९:०७.६३) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. ललिताने चांगली सुरुवात करताना एक वेळ अव्वल ५ मध्ये स्थान मिळवले होते. मात्र, नंतर तिची पिछेहाट झाली, तसेच चौथ्या फेरीपासून रुथने आघाडी घेत, आपला इरादा स्पष्ट केला आणि अखेरपर्यंत आपली आघाडी कायम राखताना सहज बाजी मारली. दुसरीकडे ललिता मात्र, पुढे येण्यासाठी झगडताना दिसली. रणजीत माहेश्वरीला तिहेरी उडीच्या पात्रता फेरीत खूप मागे राहिल्याने त्याला ३०व्या स्थानी समाधान मानावे लागले. माहेश्वरीची सर्वोत्कृष्ट उडी १६.१३ मीटर पर्यंत मर्यादित राहिली. विशेष म्हणजे, अंतिम फेरी गाठलेला अखेरचा १२वा खेळाडूने १६.६१ मीटरची उडी घेत, अंतिम फेरी निश्चित केली. (वृत्तसंस्था)